मक्कामध्ये व्यवसाय करू म्हणत कोंढव्यातील नागरिकाला 91 लाख रुपयाला फसविले
पुणे: एक फसवणुकीचा अजब प्रकार समोर आलेला असून इम्पोर्ट एक्स्पोर्टच्या व्यवसायात करोडो रुपयांचे आमिष दाखवत एका व्यवसायिकाची तब्बल 91 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे
. मंगळवारी हे प्रकरण समोर आलेले असून सहा जणांच्या विरोधात पोलिसांनी फसवणूक तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा आणि जादूटोणाअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे .
उपलब्ध माहितीनुसार , शेख अब्दुल बासित अब्दुल लतीफ ( वय 45 राहणार कोंढवा खुर्द पुणे ) असे तक्रारदार व्यक्ती यांचे नाव असून समर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद देण्यात आलेली आहे.
गणेशोत्सवामध्ये गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे बाळगणारा आरोपी जेरबंद
आयात निर्यातीच्या व्यवसायात इन्वेस्ट केल्यानंतर चांगला परतावा देऊ असे आमिष फिर्यादी व्यक्ती यांना दाखवण्यात आलेले होते.
नादीर अब्दुल हुसेन हसन अली नैमाआबादी ( वय 40 ), सीमा नादिर निमाआबादी ( वय 35 दोघेही राहणार कॅम्प पुणे ),