अतिक्रमण काढले म्हणून चक्क कानाखाली लगावले
पुणे : रस्त्यावर विनापरवानगी पथारी लावलेल्या महिलेने अतिक्रमण विरोधी कारवाई करणाऱ्या एका कामगाराच्याच कानाखाली चापट मारली. हडपसर उड्डाणपुलाखाली विवेकानंद कॉम्प्लेक्ससमोर गुरुवारी सकाळी ही घटना घडली. याबाबत पंकज पालाकुडतेवार (वय ३१) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार महिलेविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
फिर्यादी हे हडपसर क्षेत्रीय कार्यालयात सहायक अतिक्रमण निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. ते कर्मचाऱ्यांसह हडपसर उड्डाणपुलाखाली अनधिकृत हॉकर्स, पथारी व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करीत होते. आरोपी महिला फुले विक्री करीत होती. पथारी काढण्यास सांगितले असता हुज्जत घातली. फिर्यादीच्या सूचनेवरून बिगारी कामगार महिलेची पथारी काढण्यास गेले असता महिलेने कामगाराच्या श्रीमुखात चापट मारली. पोलिस उपनिरीक्षक सोनटक्के हे तपास करीत आहेत.
‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822