देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद

Crime bhanch news: सध्या पुण्यात गुन्हेगार व गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याने पोलीस अधिक दक्ष होत असून पोलिसांच्या फेऱ्या वाढल्या आहे.

स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत असताना स्वारगेट पोलीस स्टेशनकधिल तपास पथकातील पोलीस अंमलदार अनिस शेख व शिवदत्त गायकवाड यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, स्वारगेट कॅनॉल जवळील पाटबंधारे ऑफीस समोरील झाडाशेजारी एक जन स्वतःजवळ पिस्तुल बाळगुन थांबला आहे.

अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमीबाबत तपास पथकाचे प्रभारी अधिकारी प्रशांत संदे सहा. पोलीस निरीक्षक व प्रतापसिंह शेळके पोलीस उप निरीक्षक यांना माहिती दिली असता त्यांनी सुनिल झावरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट पोलिस स्टेशन यांना बातमीबाबत माहिती दिली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्यासाठी आदेश दीले होते.

त्यावरुन तपास पथकातील स्टाफसह बातमीच्या ठिकाणी जावुन खात्री करुन सापळा रचुन सिद्धेश नितीन धुमाळ वय २२ वर्षे धंदा मजुरी रा. ६७४, बालगुडे जीमसमोर, घोरपडी पेठ पुणे यास ताब्यात घेवुन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक पिस्टल व दोन जिवंत काडतुस मिळुन आल्याने त्यांच्या विरुध्द स्वारगेट पोलीस स्टेशन गु.र.नं. १४/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) (४) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🖕 Click Here

सदरची कामगिरी ही प्रविणकुमार पाटील अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर. स्मार्तना पाटील पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२, पुणे शहर. नारायण शिरगावकर सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे,

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती. संगीता पाटील, यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके, व पोहवालदार विजय कुंभार, पोलीस अंमलदार शिवदत्त गायकवाड, अनिस शेख, सोमनाथ कांबळे, फिरोज शेख, रमेश चव्हाण, संदीप घुले, दिपक खंदाड, सुजय पवार, प्रविण गोडसे, संजय मस्के यांनी एकत्र मिळुन केली आहे.

🖕 Click Here