शिवसेनेचे दीपक मारटकरचा खून करणारे जेरबंद

Deepak maratkar’s murderer arrested : राजकीय वादातून दीपक मारटकरचा खून

Deepak maratkar’s murderer arrested : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

पुणे : राजकीय वादातून शिवनेसेचे पदाधिकारी व दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे सुपुत्र दीपक विजय मारटकर (वय ३२) यांचा बुधवारी मध्यरात्री खून करण्यात आला होता.

यामुळे मध्यवस्तीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांनी काही वेळातच या खुनातील मुख्य सूत्रधार असणाऱ्या एका तरुणीसह तिघांना अटक केली आहे.

तर इतरांचा शोध घेतला जात आहे.निरंजन मकाळे, अश्विनी कांबळे, महेंद्र सराफ यांना अटक केली आहे.

तर,रोहित कांबळे, सनी कोलते,राहुल रागीर, संदीप कोलते व इतर दोघांवर फरासखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा > कोंढव्यातील खून प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात,

सदरीलप्रकरणी मारटकर यांचे मेहुणे राहुल भगवान आलमखाने (वय ४३,रा. गवळी आळी, विजयानंद चित्रपटगृहाजवळ, बुधवार पेठ) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

महापालिका निवडणुकीत विजय मारटकर यांनी बुधवार पेठेतून शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती.

त्याचवेळी अश्विनी कांबळे हिने सुद्धा बहुजन समाज पार्टीकडून या भागातूनच निवडणुक लढविली होती.

त्यावेळी मारटकर व कांबळे यांच्यात वाद झाला होता. दरम्यान, आरोपी महेंद्र सराफ याच्या बरोबर मारटकर यांचा वाद झाला होता.

तर काही महिन्यांपूर्वी दीपक मारटकर यांना आरोपींनी धमकावले होते.चारच दिवसांपूर्वी दीपक मारटकर यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात या प्रकाराची माहिती दिली होती.

🖕 Click Here

वाचा > गावठी कट्टा बाळगाणाऱ्या गुन्हेगाराला केले जेरबंद,

गुरूवारी १ ऑक्टोबर च्या मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास दिपक मारटकर जेवण करून गवळी आळी परिसरात थांबले होते.

त्यावेळी दबा धरून बसलेले हल्लेखोर दुचाकीवरून आले. दिपकवर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यास सुरूवात केली. तीक्ष्ण शस्त्राने ४७ वार करण्यात आले .

यात दिपक मारटकर गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले .मात्र उपचारादरम्यान त्यांचे पहाटे मृत्यू झाले.

माहिती मिळताच पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक आयुक्त मिलींद पाटील, फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर,

गुन्हे शाखेचे निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान याची माहिती वा-या सारखी पसरली. त्यावेळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हल्लेखोरांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले असून तीन जनांना पकडण्यात आले आहे व बाकींच्या तपासासाठी पथके रवाना केली असल्याचे सांगण्यात आले.

वाचा > नगरसेवक गफुर पठाण यांच्या स्वनिधीतून 2 व्हेंटिलेटर

दीपक मारटकर यांच्या खूनानंतर सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते हे फरासखाना पोलीस ठाण्यात जमले होते.

शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे,नगरसेवक विशाल धनवडे, अजय भोसले, प्रशांत बधे,राजेंद्र शिंदे, गजानन पंडीत,

भारतीय जनता पक्षाचे प्रमोद कोंढरे, राष्ट्रवादीचे अजय दराडे, गणेश नलावडे, रिपब्लीकन पक्षाचे मंदार जोशी, मनसेचे वसंत मोरे, रूपाली पाटील ठोंबरे,

आशिष साबळे आदींनी पोलीस उपायुक्त गोरे यांची भेट घेतली व हल्लेखोरांवर कडक कारवाईची करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

🖕 Click Here

2 thoughts on “शिवसेनेचे दीपक मारटकरचा खून करणारे जेरबंद

Comments are closed.