गणेशोत्सवामध्ये गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे बाळगणारा आरोपी जेरबंद

भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी

Ganeshotsav Pune : Crime branch news: Pune :   भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अमंलदार वरीष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली गणेशात्सवाच्या अनुषंगाने पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार मंगेश पवार व निलेश खैरमोडे यांना त्यांचे गुप्त बातमीदाराचे मार्फेतीने “एक इसम कात्रज घाटातील भिलारेवाडी, येथील पेट्रोल पंपाच्या समोरील बाजुस पिस्टल कमरेला लावुन थांबला आहे.

अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी भिलारेवाडी येथील पेट्रोल पंपाच्या पुढील बाजुचे शंभु शंकर मिसळ हाऊस हॉटेल समोरील कात्रज घाटाचे चढाचे रोडवर येवुन पाहता तेथे बातमीप्रमाणे इसम नामे सतिश गुलाबराव शेरके, वय २३ वर्षे, रा. सध्या शिंदेवाडी, शिरवळ, ता.खंडाळा, जि. सातारा, मुळ गाव मु. गोहजर, पो सारंग बिहारी, तहसील मोखेड, जि. छिंदवाडा, मध्यप्रदेश

हा त्याचे ताब्यात एक ४०,०००/- रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल व ६००/- रुपये किंमतीचे ३ जिवंत काडतुसांसह मिळुन आल्याने ते आरोपीकडुन जप्त करण्यात आले असुन त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ६०४ / २०२३, भारतीय हत्याराचा अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यास नमुद गुन्हयात अटक केली आहे.

जेठाणी ने देवरानीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली मिरची , पॉलिथिनने दिले चटके.

🖕 Click Here

सदरची कामगिरी  रितेशकुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, संदीप कर्णिक, सह आयुक्त, पुणे शहर, प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, श्रीमती स्मार्तना पाटील साो  पोलीस उप आयुक्त परिमंडळ २  नारायण शिरगावकर साो, . सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड,

तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन सरपाले, चेतन गोरे, महेश बारावकर, शैलेश साठे, निलेश ढमढेरे, अवधतु जमदाडे, अभिजीत जाधव, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, हर्षल शिंदे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.

निफ्टी २०००० वर पोहोचले, आपल्या म्युच्युअल फंडचे काय करावे ?

🖕 Click Here