खडक पोलिसांनी सराईत चोराकडून सात वाहने केली जप्त

पुणे: सराईत वाहनचोराकडून यामाहा एफझेड, होंन्डा स्प्लेंडर, होंडा पॅशन, टीव्हीएस विक्टर अशा एकूण 7 मोटार सायकल जप्त करण्यात खडक पोलीसांना यश आले आहे,

सराहित वाहन चोर गोवर्धनप्रसाद ललवा साहु, वय 35 वर्षे, राहनार सर्वे नंबर 120 किष्कींदानगर पौड रोड, दत्त मंदिराजवळ कोथरुड पुणे, याला

भांडेआळी रविवार पेठ पुणे येथून अटक केली आहे.

🖕 Click Here

त्याच्याकडून चोरीचे 2,35,000 रुपये किंमतीचे 7 मोटारसायकल जप्त केले असून सध्या आणखीन 2 गुन्हे उघडकीस आणून इतर गुन्हे उघड करण्याचे काम सुरू आहे.

सदरील कारवाई खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे संपतराव राउत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक प्रल्हाद डोंगळे ,पोलीस उप निरीक्षक अजीज बेग, पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, संदीप तळेकर, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे, आशिष चव्हाण, इरफान नदाफ, लखन ढावरे, रफिक नदाफ, प्रशांत बडदे, सागर कुडले, नितीन जाधव, तुळशीराम टेंभुर्णे, महेश जाधव, यांच्या पथकाने केली आहे.

🖕 Click Here