रवींद्र ब-हाटेची मालमत्ता जप्तीचे न्यायालयाचे आदेश,

दोन्ही तहसिलदार करणार मालमत्ता सिल.


पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणेे : फरार घोषित करण्यात आलेल्या रवींद्र ब-हाटेची मालमत्तेच्या जप्तीचे आदेश न्यायालयाने दिले असून आज ब-हाटे यांची पुण्यातील मालमत्ता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जप्त करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार हवेली तहसीलदार कोळी व पुणे शहर तहसिलदार कोलते पाटील हे आज जप्तीची ही कारवाई करणार आहे.


कोंढवा येथील लुल्लानगरमधील मधुसुधा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅट धनकवडी येथील तळजाई पठार येथील सरगम सोसायटीतील एक मोकळा प्लॉट, तसेच याच सरगम सोसायटीमधील एका प्लॉटवरील बंगला आणि कात्रज भागातील भागीदारीमधील जमीन अशा ५ मालमत्ता जप्त करण्यात येणार आहेत.


बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांना धमकावुन खंडणी वसुल केल्याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात रवींद्र लक्ष्मण ब-हाटे, दिप्ती आहेर, शैलेश जगताप, देवेंद्र जैन व अमोल चव्हाण यांच्याविरुद्ध गेल्या वर्षी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🖕 Click Here

या प्रकरणात एकूण ८ आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

मात्र यातील प्रमुख सुत्रधार रवींद्र ब-हाटे हे पोलिसांच्या हाती लागू शकलेले नाहीत.त्यामुळे त्यांना न्यायालयाने फरारी घोषित करुन मालमत्ता सीआरपीसी ८३ प्रमाणे जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

🖕 Click Here