सहाय्यक फौजदार व 3 महिला पोलीसांवर गुन्हा दाखल,

(case filed against police) पोलीस मुख्यालयात उडाली खळबळ.

(case filed against police) Crime Branch News प्रतिनिधी :

पुणे शहरातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

व ३ महिला पोलीस कर्मचाऱ्यांविरूध्द महिलेचा विनयभंग आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील घटनेने पोलीस दलामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. एका पोलीस महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार रत्नकांत गणपतराव इंगळे (वय ५४ ) यांच्यासह ३ महिला कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंद केला आहे.

सदरील प्रकार जून २०२० -२०२१ दरम्यान घडला आहे.

वाचा : झोमॅटो व स्वीगी कंपनीची पार्सल डिलेव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीसांनी केली अटक,

मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला पुणे पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत.

सहाय्यक उपनिरीक्षक रत्नकांत इंगळे हे मुख्यालयात आहेत तर इतर ३ महिला पोलीस देखील मुख्यालयात कार्यरत आहेत.

फिर्यादी महिले बाबत ३ महिला कर्मचाऱ्यांनी इंगळे यांच्याकडे तक्रार अर्ज केले होते.

🖕 Click Here

त्याबाबत त्यांनी फिर्यादी यांना फोन करून विचारपूस केली.

मात्र, यावेळी त्यांनी अश्लील बोलत विनयभंग केला असे फिर्यादीत म्हंटले आहे.

फिर्यादी यांना इतर ३ महिलांनी त्यांना सार्वजनिक शौचालयाकडे जात असताना अडविले त्यांना जाऊ दिले नाही.

तर त्या घरी गेल्यानंतर पुन्हा ३ महिला फिर्यादी यांच्या घरात शिरल्या

व त्यांनी फिर्यादी यांचा फोन व इतर वस्तू आपटून फोडल्या.

त्यांनी केलेला अर्ज मागे घ्यावा यासाठी अश्लील शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

फिर्यादी महिलेने याबाबत न्यायालयात दाद मागितली होती.

न्यायालयाने १५६/३ नुसार पोलिसांना गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिल्याने त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टेलेग्राम चायनलवर जॉइन होण्यासाठी क्लिक करा.

🖕 Click Here