मोक्यातील दोन फरार आरोपींना कोंढवा पोलीसांनी केली अटक


कोढवा : अटक आरोपी व फरार आरोपी यांनी दोन मुलाचे वर्चस्वाच्या वादातुन अपहरण करुन त्यांना डांबुन ठेवुन त्याच्या पैकी एकाला जबर मारहाण करुन खुन केला होता.

तसेच दुसन्या मुलाला गंभीर जखमी करुन रोडवर फेकुन दिले होते.

त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्हयात आरोपी नामे राजेंद्र उर्फ राजु ठोबरे व आमिन उर्फ धान्या कांरजे हे गुन्हा केल्यापासुन फरार होते.

सदर आरोपी याचा तपास पथकातील अधिकारी लेखाजी शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, दिनेश पाटील, सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार पोलीस हवालदार. अमोल हिरवे, पोलीस हवालदार राहुल वंजारी, पोलीस शिपाई अभिजीत रत्नपारखी पोलीस शिपाई सुहास मोरे, पोलीस शिपाई विकास मरगळे, पोलीस शिपाई जयदेव भोसले, पोलीस शिपाई राहुल थोरात, पोलीस शिपाई. शंशाक खाडे, पोलीस शिपाई आशिष गरुड, पोलीस शिपाई रोहित पाटील, असे गुप्त बातमीदाराच्या मदतीने शोध घेत होते.

🖕 Click Here


वरिल आरोपी पैकी आरोपी राजेंद्र उर्फ राजु ठोबरे, वय २१ वर्षे, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खु पुणे हा आशिर्वाद चौकात वेश बदलुन दि. ०२/११/२०२३रोजी सकाळी ०८.०० वा सुमारास येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार राहुल थोरात, जयदेव भोसले, विकास मरगळे यांना बातमीदाराकडुन प्राप्त झाली होती.

सदर माहितीच्या अनुषंगाने आशिर्वाद चौकात थांबला असता आरोपी राजेंद्र उर्फ राजु ठोबरे हा तोडावर माकड टोपी व अंगात जर्किंग घालुन आशिर्वाद चौकात याठिकाणी आला असताना त्याला पोलीसांची चाहुल लागल्याने तो पळु जावु लागला त्याचा सिने स्टाईल पाठलाग करुन त्यास ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे..

तसेच आरोपी हा आमिन उर्फ घा-या हुसेन कांरजे, वय २२ वर्षे, रा. लक्ष्मीनगर, ग.न.०२, कोंढवा बु .पुणे हा चंदनगर याठिकाणी लपुन राहत असुन तो दि. ०३/११/२०२३ रोजी खड़ी मशीन चौक याठिकाणी ओळख लपवुन तोडावर मास्क व टोपी घालुन येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार शंशाक खाडे, अमोल हिरवे, सुहास मोरे यांना त्याच्या खास बातमीदाराकडुन प्राप्त झाली होती.

सदर माहितीच्या अनुषंगाने त्यास खड़ी मशीन याठिकाणी दि. ०३/११/२०२३रोजी पकडण्या करिता गेलो असता त्याला पोलीसांची चाहुल लागल्याने तो रस्त्याने जाणान्या टेम्पोला लटकुन पळुन जावु लागला असता त्याचा सिने स्टाईल पाठलाग करुन त्यास ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे.

नमुद दाखल गुन्हयाचा पुढील तपास शाहुराव साळवे, सहा. पोलीस आयुक्त हे करित आहेत.

वरिल कामगिरी ही संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संदिप भोसले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) व संजय मोगले पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे करण्यात आली आहे.

🖕 Click Here