मक्कामध्ये व्यवसाय करू म्हणत कोंढव्यातील नागरिकाला 91 लाख रुपयाला फसविले

पुणे: एक फसवणुकीचा अजब प्रकार समोर आलेला असून इम्पोर्ट एक्स्पोर्टच्या व्यवसायात करोडो रुपयांचे आमिष दाखवत एका व्यवसायिकाची तब्बल 91 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे

. मंगळवारी हे प्रकरण समोर आलेले असून सहा जणांच्या विरोधात पोलिसांनी फसवणूक तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा आणि जादूटोणाअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे .

उपलब्ध माहितीनुसार , शेख अब्दुल बासित अब्दुल लतीफ ( वय 45 राहणार कोंढवा खुर्द पुणे ) असे तक्रारदार व्यक्ती यांचे नाव असून समर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद देण्यात आलेली आहे.

गणेशोत्सवामध्ये गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे बाळगणारा आरोपी जेरबंद

आयात निर्यातीच्या व्यवसायात इन्वेस्ट केल्यानंतर चांगला परतावा देऊ असे आमिष फिर्यादी व्यक्ती यांना दाखवण्यात आलेले होते.

नादीर अब्दुल हुसेन हसन अली नैमाआबादी ( वय 40 ), सीमा नादिर निमाआबादी ( वय 35 दोघेही राहणार कॅम्प पुणे ),

शोएब महमुद्दिन आत्तार ( वय 35 ), माजीद उस्मान अत्तार ( वय 50 ) खालीद मुलुद्दीन अत्तार ( वय 32 राहणार बोपोडी पुणे ) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

🖕 Click Here

जेठाणी ने देवरानीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली मिरची , पॉलिथिनने दिले चटके.

फिर्यादी यांचा चप्पलचा व्यवसाय असून आरोपींनी त्यांना इम्पोर्ट एक्स्पोर्टच्या व्यवसायात इन्व्हेस्ट केल्यानंतर चांगल्या परताव्याचे आमिष दिलेले होते.

त्यांच्यावर विश्वास ठेवून शेख यांनी तब्बल 90 लाख 75 हजार रुपये वेळोवेळी त्यांच्या खात्यात जमा केले मात्र कुठलाही परतावा त्यांना देण्यात आला नाही .

मक्कामध्ये व्यवसायाचे आमिष देखील त्यांना देण्यात आलेले होते त्यासाठी शोएब याने जादूटोणा करत त्यांना गुंगीचे पाणी पाजले आणि ताईत बनवून देण्यासाठी देखील पैसे घेतले , असे देखील त्यांनी फिर्यादीत म्हटलेले आहे .पुढील तपास समर्थ पोलीस करत आहे.

निफ्टी २०००० वर पोहोचले, आपल्या म्युच्युअल फंडचे काय करावे ?

🖕 Click Here