मास्क न लावणाऱ्यांस हटकले असता टोळक्यांकडून मारहाण
Not Applying Mask :पार्किंग मधील बांबू घेऊन पाठीवर, पायावर आणि हातावर मारहाण केली.

Not Applying Mask : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : सोसायटीच्या आवारात मास्क न लावणाऱ्या हटकले असता,
त्यांने त्याच्या साथीदारांच्या मदतीने सोसायटीतील व्यक्तीस बांबूने बेदम मारहाण केली. ही घटना आंबेगाव खुर्द येथे घडली आहे.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खबर्या करतोस का असे म्हणत नाना पेठेत युवकाला मारहाण,
अमित पाटील (३९ रा.आंबेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानूसार कृष्णा बबन लोखंडे, अजय भगवान घाडगे, अनिल संभाजी नेटके (सर्व रा. आंबेगाव खुर्द)
आणि त्यांच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.फिर्यादी अमित पाटील हे रहात असलेल्या सोसायटीमध्ये आरोपी मास्क न लावता आले होते.
त्यांना पाटील यांनी हटकले असता त्यांना त्याचा राग आला. या सर्वांनी मिळून त्यांना शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
यात त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली. तर एकाने पार्किंग मधील बांबू घेऊन पाठीवर, पायावर आणि हातावर मारहाण केली.
याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक ए.आर.कवठेकर करत आहेत.
पुणे महानगर पालिकेत ऑन ड्युटी वर दारू पिणाऱ्या जमादार समर्थनार्थ पुण्यातील वकिलाची अजब मागणी

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: (3 criminals Tadipaar) पुण्यातील ३ गुन्हेगारांना पोलिसांनी केले तडीपार,