सराईत गुडांच्या अत्यविधीची रॅली काढुन फरार झालेले आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

(crime branch arrested criminals) युनिट-१ ,गुन्हे शाखा , पुणे शहर यांचेकडून कारवाई

(crime branch arrested criminals) crime branch News प्रतिनिधी :

बिबवेवाडी येथील खुनाचा प्रयत्न व सराईत गुडांच्या अत्यविधीची रॅली काढुन दहशत पसविणा-या ३ गुन्हयातील आरोपीस पकडण्यास पोलिसांना यश आले आहे .

दिनांक १५/५/२०२१ रोजी रात्री ०१.३० वा सुमारास सावन गवळी रा. बिबवेवाडी ओटा पुणे यास त्याच्या ओळखीचा मित्र

Advertisement

सुनिल खाटपे याने त्यांचा मित्र आनंद कामठे याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा व्हॉटसपवर स्टेटस ठेवल्याचा राग मनात धरुन

“बघ आज तुझे तुकडे करायला कशी माझी गँग आली आहे” असा आरडाओरडा करीत सुनिल खाटपे व त्याचे साथीदार अमित खाटपे,

माधव वाघाटे, सिध्दार्थ पलंगे, कुणाल चव्हाण व इतर ५ ते ६ इसमांनी हातातील लोखडी कोयत्याने सावन गवळी याच्या डोक्यात वार केले,

Advertisement

तो वार चुकवला असता लाकडी बांबु व दगडाने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली.

त्याबाबत सावन गवळी याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने ३०७, १४३, १४७, १४८, १४९ मपोका कलम ३७(१) सह १३५ गुन्हा दाखल करण्यात आला होता.

pune-crime-branch-arrested-criminals

वाचा : कासेवाडीत 2 सराईत गुन्हेगारासह 1 तडीपार गुन्हेगार हत्यारासह पोलिसांच्या जाळ्यात

Advertisement

वरील भांडणामध्ये सहकारनगर पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार माधव वाघाटे यांचा बिबवेवाडी ओटा येथे खुन झाला होता.

त्यांनतर सदर गुन्हेगारांची मयत बॉडी ही त्याच्या राहत्या घरी हेरंब अपार्टमेंट बालाजीनगर पुणे येथे ससुन हॉस्पीटल मधुन आणल्यानंतर पुढील अंत्यविधी करीता कात्रज स्मशानभुमी येथे दुपारी ०१.०० वा सुमारास अॅम्ब्युल्नस मधुन घेवुन जात होते.

त्यावेळी अॅम्ब्युलन्सचे मागे किमान १०० ते १२५ दुचाकी वाहनावर डबल सिट,

ट्रिपल सिट बसुन जात होते ,पुणे शहर आयुक्तालयांचा कार्यक्षेत्रात शांतता व सुव्यवस्था राखणेकामी जमाव करण्यास,

Advertisement

सभा घेण्यास, व मिरवणुक काढण्यास बंदी असल्याबाबत आदेश असताना देखील अंत्यविधीची परवानगी न घेता सदर आदेशाचा भंग करुन सिध्दार्थ पलंगे,

कुणाल चव्हाण, सुनिल खाटपे, अमित खाटपे, रामा उमाप यांनी नेतृत्व करुन बालाजीनगर ते कात्रज स्मशानभुमी दरम्यान रॅली काढुन दहशत निर्माण केली होती.

त्याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात १४३, ३०८,३३२, २६८.२६९, २७०, १८८, १५८, १२०(ब), मपोका कलम ३७(१) सह १३५,

Advertisement

क्रीमीनल लॉ ॲमेन्टमेंट ॲक्ट कलम ७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१(ब),

साथ रोग अधिनियम १८८७ चे कलम ३ तसेच भारती विदयापीठ पोलीस स्टेशन गुरनं ४१९/२०२१ भादंवि
कलम १८८,२६९ मपोका कलम ३७(१) सह १३५,

महाराष्ट्र कोव्हीड – १९ उपाययोजना २०२० चे कलम ११, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१(ब) प्रमाणे गुन्हा नोंद केले होते.

Advertisement

त्यापैकी नेतृत्व करणारे काही आरोपी अटक करण्यात आले होते त्यातील सिध्दार्थ पलंगे हा वरील खुनाचा प्रयत्न व अंत्यविधीची रॅली काढलेबाबत गुन्हा दाखल झालेपासुन २ महिन्यापासुन फरार होता.

दिनाक – २२/०६/२०२१ रोजी पोलीस अंमलदार अमोल पवार यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली की,

वरील गुन्हयातील फरार असलेला आरोपी सिध्दार्थ पलंगे हा खेड शिवापुर दर्गाजवळ मित्राला भेटणेसाठी येणार आहे,

Advertisement

त्या बाबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव युनिट-१, गुन्हे शाखा यांना कळविण्यात आले.

त्यांनी दिलेल्या सुचनेनुसार त्या ठिकाणी जावुन खात्री करीत असताना सदर आरोपी हा खेड शिवापुर दर्गाजवळ मिळुन आला .

त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव सिध्दार्थ संजय पलंगे ( वय २१ वर्षे रा. गुलमोहर सोसा. रजनी कॉर्नर बालाजीनगर पुणे) असे सांगितले.

त्यांस युनिट – १ गुन्हे शाखा पुणे येथे आणुन वरील दाखल गुन्हयाच्या अनुशंगाने विश्वसात घेवुन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने वरील ३ गुन्हे केल्याचे कबुल केले.

Advertisement

सदर आरोपीवर सहकारनगर,दत्तवाडी,बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे जबर दुखापत, मारामारी अशा प्रकारचे एकुण ०३ गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी गुन्हे शाखा पुणे शहर चे अपर पोलीस आयुक्त, अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे. श्रीनिवास घाडगे,

सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-१ सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदशना खाली युनिट-१ गुन्हे शाखा, पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव ,

Advertisement

पोलीस उप-निरीक्षक सुनिल कुलकर्णी, संजय गायकवाड पोलीस अंमलदार अमोल पवार, अजय थोरात, इम्रान शेख,

तुषार माळवदकर, आय्याज दड्डीकर व महेश बामगुडे यांनी केली असल्याची माहिती मिळाली.

वाचा : भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंताने निलंबनाचे ऐकताच आला हृदयवीकाराचा झटका!

Advertisement
Spread the love
कमी गुंतवणुकीत आजच आपले News Portal बनवा व पैसे कमवा

न्यूज वेबसाईट एका दिवसात बनवून मिळेल.