पप्पु येणपुरे गँग वर मोक्का दाखल
(Pappu Yenpure) आतापर्यंत मोक्का अंतर्गत ही ४९ वी कार्यवाही. लवकरच होणार वाटत अबतक ५६
(Pappu Yenpure ) क्राईम ब्रांच न्यूज (प्रतिनिधी) : पुणे : प्रविण उर्फ पप्पू अनंता येणपुरे याच्या गॅंगवर पुणे पोलिसांनी मोकका कायद्याअंतर्गत केली कारवाई.
येणपुरे याने प्रत्येक गुन्हयाच्या वेळी सोबत वेगवेगळे साथीदार घेवुन आपल्या टोळीची दहशत व वर्चस्व राखण्यासाठी,
तसेच स्वतःचे व टोळीचे अवैध आर्थिक फायद्याकरीता दरोड्याची तयारी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न,
घातक शस्त्र, दहशत माजविणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत.
तसेच १ ऑगस्ट रोजी पप्पु येणपुरे व त्याच्या साथिदारांनी कोयत्याचा धाक दाखवुन मारहाण करत निखिल ला लुबाडले
व परिसरात घातक हत्याराच्या सहाय्याने दहशत पसरविली म्हणुन निखिल पप्पु गायकवाड (रा. सच्चाईमाता, आंबेगाव खुर्द, पुणे ) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.