चोराची कमाल पोलिस ठाण्याजवळील चोरला माल

(Near khadak police station) खडक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल.

(Near khadak police station) : क्राईम ब्रांच न्यूज प्रतिनिधी पुणे :

खडक पोलीस ठाण्या जवळील मामलेदार कचेरी मधील मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे.

चोरी करून चोरांनी एकाप्रकारे खडक पोलीसांना ( Khadak Police Station Pune) आव्हानच दिले आहे.

जुने हवेली पोलीस ठाणे मामलेदार कचेरी आवार येथील मुद्देमाल रुम मध्ये १२ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान मुद्देमाल रुम हे कुलुप लावुन बंद असताना

कोणीतरी अज्ञात चोरटयाने मुद्देमाल रुमचे छताची कौले काढुन त्याव्दारे मुद्देमाल रुममध्ये प्रवेश करुन अॅल्युमिनिअमच्या पट्टया,

१५ किलो तांब्याची तार, ४५ किलो भारत कंपनीचा गॅस सिलेंडर , लोखंडी टी टाईप पत्रे ७० नग,

लोखंडी काटेरी तांब्याची तार ४०० फुट, शिशाच्या लादया वजन २२५ किलो,

🖕 Click Here

अॅल्युमिनिअच्या लादया वजन ४०० किलो असा सर्व मिळुन एकुण २७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला आहे.

या संदर्भात दिलीप गायकवाड पोलीस अंमलदार हवेली यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब सावंत करत आहेत.

वाचा : गुन्हा दाखल झालेल्या पुण्यातील त्या पोलीस निरीक्षकाची अखेर उचलबांगडी,

🖕 Click Here

One thought on “चोराची कमाल पोलिस ठाण्याजवळील चोरला माल

Comments are closed.