लाखो रुपयांचे दागिने असलेली बॅग रिक्षात विसरलेल्या महिलेला खडक पोलिसांनी परत मिळवून दिली .

क्राइम ब्रांच न्यूज :पुणे : आज दि.27 एप्रिल रोजी सकाळी 8 वा. सुमारास महिला नामे पल्लवी कुणाल लुंकड (वय 39 धंदा= सीए रा. मानपाडा) या पुणे स्टेशन वरून रिक्षा घेऊन पार्श्वनाथ जैन मंदिर पुणे येथे दर्शनासाठी आले होते , त्यांची रिक्षामध्ये मौल्यवान वस्तू व महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग विसरली होती.

सदरील बॅगमध्ये 4 तोळ्याचे गंठण व एक लाख वीस हजार रुपयाची बेरर चेक व तसेच शाळेचे संस्थेचे फी रजिस्टर असा एकूण अंदाजे 3 लाख 40 हजार रुपये किमतीचा ऐवज होता.

सदरील महिलेने मीठगंज पोलीस चौकी येथे येऊन घडलेला प्रकार सांगितला असता घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पोलीस शिपाई पठाण .

पोलीस शिपाई शेख , पोलीस शिपाई खरात यांनी मिळून हद्दी मधील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून सदर रिक्षा क्रमांक MH12QE8060 मालकाचा शोध घेऊन सदरील बॅग प्राप्त करण्यात आली.

🖕 Click Here

सदरची बॅग महिला पल्लवी लुंकड यांच्या ताब्यात दिली असून सदर महिलेने खडक पोलीस स्टेशन मधील सर्वांचे आभार मानले आहेत

🖕 Click Here