पोलीसाच्या हाताला चावा घेतल्याने भाजी विक्रेत्या विरोधात गुन्हा दाखल.
Vegetable seller : हडपसर चिंतामणीनगर हांडेवाडी रोड,इशा अॅम्पायर सोसायटीचे समोरील प्रकार,

Vegetable seller : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुणे हडपसर चिंतामणीनगर हांडेवाडी रोड,इशा अॅम्पायर सोसायटीचे समोरील रोडवर
अशोक शिंदे, पो.उप.निरी. हांडेवाडी वाहतुक विभाग,पुणे हे अधिकारी सहा.पो.निरी.जयवंत पाटील पो.शि.गरुड, पो.शि.केदार
यांचेसह तसेच होमगार्ड कर्मचारी डी.डी.शिंदे पुणे शहर याचेसह हांडेवाडी वाहतुक विभागा मध्ये पुणे मनपाचे कर्मचारी यांचेसह
सयुक्त अतिक्रमण कारवाई करीत होते.
वाचा : चोरट्यांनी चोरले 60 हजार रुपयांचे गंठण,
कारवाई करीत असताना ठिकाणी यातील आरोपी नईम चुन्नुमिया सौदागर,वय-४७ वर्षे,रा.सैय्यदनगर ग.नं.
१०, हडपसर, हा रोडवर भाजीपाला विकण्यासाठी बसला असताना, फिर्यादी यांनी त्यास तेथुन भाजीपाला काढुन घेण्यास
सांगितला असता त्याने फिर्यादी यांचेशी हुज्ज्त घालुन,अरेरावीची भाषा करून मी भाजीची पथारी उचलणार नाही,तुम्हाला काय
करायचे ते करा” असे म्हणुन अंगावर धाऊन येवुन,फिर्यादी यांचे डावे हाताचे करंगळीस चावा घेवुन त्यांना जखमी करुन,फिर्यादी
हे त्यांचे सरकारी काम करीत असताना,ते करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला असल्याने शिंदे यांनी
सौदागर विरोधात वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने सौदागर याला वानवडी पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जोगदंड करीत आहे.
Birthday party Ko Lee gai Talwar padi bhari

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: Pune Mayor Muralidhar Mohol Corona Positive मुरलीधर मोहोळ