भोलावालेसह पाच साथीदारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई

Crime branch news : पुणे : जुन्या भांडणाच्या रागातून एकाला लोखंडी रॉड, हॉकी स्टिकने मारहाण करणाऱ्या तौफिक रियाज भोलावाले व इतर त्याच्या पाच साथीदारांविरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत ४३ संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे.

फिर्यादी हे दि. ९ जुलै रोजी कमला नेहरू चौक येथे असलेल्या सुंदर पान शॉपजवळ रात्री त्यांच्या मित्रांसोबत गप्पा मारत थांबले होते. यावेळी फिर्यादी यांच्या ओळखीचा असलेल्या तेजस होनमाने व अजिम सय्यद याची १५ ऑगस्ट चौक येथे चहाच्या टपरीवर भांडण झाले होती. त्या भांडणाचा राग मनात धरून तौफिक भोलावाले, उजेर शेख, ऋतिक गायकवाड, रफिक शेख व इतर एक तसेच त्यांचे साथीदार यांनी फिर्यादी यांना लोखंडी रॉड, हॉकी स्टिक व लाकडी बांबूने मारहाण करून गंभीर दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोंढव्यात दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगाराविरोधात एमपीडीए ची कारवाई

टोळीप्रमुख भोलावाले विरोधात नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने आपल्या नावाने टोळी तयार करून, मागील सहा वर्षांपासून तो गुन्हेगारी कारवाया करत आहे. या टोळीवर

🖕 Click Here

प्राणघातक शस्त्र जवळ बाळगणे, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, बेकायदेशीर जमाव जमवून नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, आपल्या टोळी सदस्यांकडून गुन्हे घडवून आणणे दहशत निर्माण करणे. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखणेकामी काढलेल्या आदेशाचा भंग करणे तसेच पुणे शहराच्या मध्यवस्तीमध्ये आपल्या टोळीचे वर्चस्व वाढावे व आर्थिक फायदा व्हावा तसेच जनमानसात दहशत राहावी म्हणून ते गंभीर स्वरूपाचे गुन्हे ते करत होते.

फरासखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) मंगेश जगताप यांनी परिमंडळ-१ चे पोलिस उपायुक्त चे संदीप सिंह गिल यांच्यामार्फत पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांना प्रस्ताव, सादर केलेला होता. त्याला अपर पोलिस आयुक्तांनी मान्यता दिल्याने मोक्का कारवाई केली.

पुण्यातून तीन वर्षांत २ हजार ६०९ मुली-महिला बेपत्ता

🖕 Click Here