वैद्यकीय उपचार व अत्यावश्यक सेवेकरीता शहरात ऑटो रिक्षा चालू राहणार
Emergency services : वैद्यकीय उपचार व अत्यावश्यक सेवेकरीता शहरात ऑटो रिक्षा चालू राहणार,

Emergency services :पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुणे शहरात कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून रुग्ण संख्या काही कमी होत नसल्याने
पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी १३ जुलै पासून पुन्हा १० दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केली आहे.
त्यात वैद्यकीय उपचारासाठी व अत्यावश्यक सेवेकरीता नागरिकांना अडचणी येउ नये यासाठी पुणे शहर वाहतूक विभागाने शहरात ऑटो रिक्षा चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
व्हॉट्सअपव्दारे मटका घेणा-या महिलेस पोलीसांनी घेतले ताब्यात
वाहतुक शाखा व सिटीग्लाईड यांचे संयुक्त विद्यमाने काही परवानाधारक ऑटो रिक्षांना एका प्रवाशा करीता वाहतुक करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
सदरची ऑटो सेवा ही तातडीचे वैद्यकीय उपचाराचे अनुषंगाने व अत्यावश्यक सेवेकरीता ये जा करणा-या नागरीकांकरीता सुविधा
उपलब्ध करून देणार असून ऑटो रिक्षा प्राप्त करण्यासाठी 9859198591 हा व्हॉटस्अप मोबाईल क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
या क्रमांकावर व्हॉटस्अप द्वारे संपर्क साधल्यावर प्रवास कोणत्या कारणा करीता करणार आहे याची माहिती घेऊन सदरचे कारण हे अत्यावश्यक सेवेत बसत आहे.
अशाच कारणा करीता रिक्षा उपलब्ध होणार आहे.
सदर सेवा देणारे रिक्षा चालक हे वय वर्ष ४५ वर्षाचे आतील असून ऑटो रिक्षा ही सॅनिटाईज केलेली व प्रवास करताना रिक्षा चालक व प्रवासी यांनी मास्क वापरणे अनिवार्य आहे.
राष्ट्रवादी युवा किसान संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस पदी मुज्जम्मील शेख यांची निवड
तसेच रिक्षात हॅन्ड सॅनीटायझर उपलब्ध करुन देणे बाबत रिक्षा चालक यांना सुचना देण्यात येणार आहेत.
मागील लॉकडाऊनचे कालावधीत २२००० अत्यावश्यक सेवेचे कॉल धारक नागरीकांना ऑटो उपलब्ध करुन देण्यात आल्याचे पोलिसांनी कळविले आहे.
नागरीकांनी व्हॉटस्अप मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अप्पर पोलीस आयुक्त वाहतूक डॉ संजय शिंदे यांनी केले आहे.

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: (online e pass) ऑनलाईन ई-पास काढुन देणाऱ्या भांमट्यावर पोलिसांची कारवाई