१० लाख रूपयांचे चरस विक्रीसाठी आलेल्या तरूणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली अटक

(Anti-drug squad arrests) १० लाख १० हजार ५०० रूपयाचे ऐवज जप्त

(Anti-drug squad arrests) क्राईम ब्रांच न्यूज (प्रतिनिधी) :

पुण्यामध्ये चरस विक्रीसाठी आलेल्या तरूणाला गुन्हे शाखेकडील अंमली पदार्थ विरोधी पथक १ ने अटक केली आहे.

पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड हे त्यांचे पथकातील कर्मचाऱ्यांसोबत खडकी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात

अंमली पदार्थ गैरव्यवहाराचे अनुषंगाने माहिती काढणे करीता पेट्रोलिंग करीत असताना एलफिस्टन रोड, एस. एम. जोशी हॉस्पीटल,

समोरील खडकी बाजार बसस्टॅण्ड समोरील सार्वजनिक रोडवर विकास बब्बरसिंह इटकान

(वय-२२ वर्षे रा. हाऊस नं.११०९ ए, वॉर्ड नं.१० भारतनगर हिंसार हरीयाणा) हा त्याच्या जवळ असलेल्या सॅगबॅगेसहित संशयितरित्या मिळुन आल्याने

त्यास पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी पंचासमक्ष सँगबॅगची पाहणी केली असता त्यामध्ये १० लाख १० हजार ५०० रूपयाचे ऐवज मिळून आले.

त्यात १ किलो चरस आणि ओपो कंपनीचा मोबाईल मिळून आला आहे.

वाचा :गोळीबार करुन फरार झालेल्या आरोपीस गुन्हे शाखेने केले जेरबंद

🖕 Click Here

त्या विरोधात खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे करीत आहेत.

सदरील कामगिरी अंमली पदार्थ विरोधी पथक,१ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड,

सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार सुजित वाडेकर, संदिप जाधव,

राहुल जोशी, विशाल दळवी, पांडुरंग पवार, प्रविण उत्तेकर, विशाल शिंदे, संदेश काकडे, रेहना शेख, नितेश जाधव,

योगेश मोहिते यांनी केली आहे.

वाचा : सय्यदनगरमध्ये दोन गटात हाणामारी, तलवारी-कोयते नाचवत घातला धुमाकूळ.

🖕 Click Here