पप्पु येणपुरे गँग वर मोक्का दाखल


🖕 Click Here

(Pappu Yenpure) आतापर्यंत मोक्का अंतर्गत ही ४९ वी कार्यवाही. लवकरच होणार वाटत अबतक ५६

(Pappu Yenpure ) क्राईम ब्रांच न्यूज (प्रतिनिधी) : पुणे : प्रविण उर्फ पप्पू अनंता येणपुरे याच्या गॅंगवर पुणे पोलिसांनी मोकका कायद्याअंतर्गत केली कारवाई.

येणपुरे याने प्रत्येक गुन्हयाच्या वेळी सोबत वेगवेगळे साथीदार घेवुन आपल्या टोळीची दहशत व वर्चस्व राखण्यासाठी,

तसेच स्वतःचे व टोळीचे अवैध आर्थिक फायद्याकरीता दरोड्याची तयारी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न,

Advertisement

घातक शस्त्र, दहशत माजविणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत.

तसेच १ ऑगस्ट रोजी पप्पु येणपुरे व त्याच्या साथिदारांनी कोयत्याचा धाक दाखवुन मारहाण करत निखिल ला लुबाडले

व परिसरात घातक हत्याराच्या सहाय्याने दहशत पसरविली म्हणुन निखिल पप्पु गायकवाड (रा. सच्चाईमाता, आंबेगाव खुर्द, पुणे ) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

व्हिडीओ पहा : सय्यदनगरमध्ये दोन गटात हाणामारी. तलवारी-कोयते नाचवत घातला धुमाकूळ,

टोळीचा म्होरक्या (१) प्रविण उर्फ पप्पू अनंता येणपुरे (वय २७ वर्षे रा.अटल चाळ नं. १०, घर नं ४३, सर्वे नं. ४३, सचाईमाता, आंबेगाव खुर्द,)

व त्याचे साथिदार २) अजित अंकुश धनावडे (वय २४ वर्षे रा. अटल १०, रुम नं. ०१, मेहरा किराणा सुपर मार्केट, सच्चाईमाता नगर, आंबेगाव खुर्द,)

३) अभिजीत नंदु बोराटे (वय ३१ वर्षे, रा. स.नं. ५७, वाघजाई मंदिरामागे, आंबेगाव खुर्द, कात्रज) यांना अटक करण्यात आली आहे.

Advertisement

पप्पु येणपुरे टोळीवर यापुर्वी सन २०१६ पासुन गंभीर गुन्हे दाखल आहेत.

गुन्हेगारी कृत्यांपासुन परावृत्त करण्याच्या उद्देशाने त्याच्यावर यापुर्वी प्रतिबंधक कारवाई तसेच हद्दपारी सारखी कारवाई करण्यात आली होती.

🖕 Click Here

कारवाई करुन देखील त्यांच्या गुन्हेगारी वर्तनात काही एक चांगला परिणाम झाला नसल्याने त्यांच्यावर ठोस व कडक कारवाई करणे आवश्यक असल्याने त्यासाठी पुढील कार्यवाही करण्यात आली आहे.

Advertisement

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील पोलीसांना दिलेल्या आदेशानुसार वरील सक्रिय गुन्हेगारी टोळीवर

भारती विद्यापीठ पोलीस ठाणे येथे दाखल असणारे गुन्ह्यास मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई होण्यासाठी संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे यांनी

सागर पाटील ,पोलीस उपआयुक्त परिमंडळ-०२ यांच्या द्वारे प्रस्ताव सादर केला होता.

Advertisement

तो प्रस्ताव १९ ऑगस्ट रोजी मंजुर करण्यात आला.

सदरचा मोक्का प्रस्ताव जगन्नाथ कळसकर भारती विद्यापीठ पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली संगिता यादव पोलीस निरीक्षक (गुन्हे)

विजय पुराणीक, पोलीस निरीक्षक (गुन्हे), आशिष कवठेकर, वैभव गायकवाड कृष्णा बढे,

Advertisement

महेश बारवकर, निलेश ढमढेरे व अमित शेडगे यांनी सादर केला आहे.

पुढील तपास सुषमा चव्हाण सहाय्यक आयुक्त स्वारगेट हे करीत आहे.

वाचा : १० लाख रूपयांचे चरस विक्रीसाठी आलेल्या तरूणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली अटक

Advertisement

🖕 Click Here