पेटीएम अपडेट करून देतो असे म्हणत २ लाखांना घातला गंडा


🖕 Click Here

Paytm update fraud cases : सिमकार्ड फोरजी करण्याच्या बहाण्याने ही बँक खात्यातून १ लाख १९ हजार रुपये काढले

Paytm update fraud cases

Paytm update fraud cases : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : सिमकार्ड आणि पेटीएम केवायसी अपडेट करून देतो असे म्हणत पुण्यातील दोन महिलांची दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

वानवडी पोलिस ठाण्यात एका 36 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

त्या तक्रारीनुसार ती महिला घरी असताना आयडिया कंपनीतून बोलत असल्याचे सांगत अमन वर्मा नावाच्या व्यक्तीने त्यांना फोन केला .

Advertisement

त्याने सिमकार्ड फोरजी करण्याच्या बहाण्याने त्यांना एक मेसेज पाठवून तो १२३४५ क्रमांकावर पाठवण्यास सांगितले.

यानंतर त्याने सिम कार्ड आणि फिर्यादीच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात एक्सेस स्वतःकडे घेतला.

यानंतर त्यांच्या बँक खात्यातून १ लाख १९ हजार रुपये काढून घेतले.

Advertisement

गुन्हे शाखेकडून ७ लाख ६५ हजार रुपयांची विदेशी सिगारेट जप्त

🖕 Click Here

तर दुसऱ्या घटनेत एका ५३ वर्षाच्या शिक्षकेने चतु:र्श्रुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संबंधित महिलेच्या मोबाईलवर केवायसी अपडेट करण्याचा मेसेज आला होता. ते अपडेट न केल्यास पेटीएम बंद होईल असे सांगण्यात आले.

Advertisement

पेटीएम चालू ठेवण्यासाठी ऑनलाईन माहिती भरण्यास सांगितले.‌यानंतर फिर्यादीस पैसे ट्रान्सफर करण्यास सांगून पैसे चार वेळा परत केले.

फिर्यादीला सर्व पैसे परत मिळतील असा विश्वास ठेऊन १ लाख ८० हजार रुपये त्यांच्या कडून घेतले.

मात्र त्यातील केवळ ९६ हजार ५०० रुपये परत करून ८४ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक माया देवरे करत आहेत.

Advertisement

सत्तेची चव आणि सत्तेची हाव अत्यंत वाईट असते

🖕 Click Here