पुण्यातील एका अॅम्ब्युलन्स सर्व्हिसेस विरोधात ४२० चा गुन्हा दाखल,
Ambulance service in pune :पुण्यातील एका अॅम्ब्युलन्स सर्व्हिसेस विरोधात ४२०चा गुन्हा दाखल,

Ambulance service in pune :पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुणे शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे(RTO) नोंदणी केलेल्या वाहनात
बरेच जण वाहनांची डिझाईन,कलर बदलून रस्त्यावर वाहने चालवतात वाहतूक पोलीसांनी धरले की मग त्यांची बोबडी वळते.
मनमर्जी प्रमाणे नागरिक खरेदी केलेल्या वाहनात बदल करतात. त्यात कारवाई होत नसल्याने बिनधास्त वाहनात बदल करण्याचे प्रमाणही काही कमी नाही.
असाच एक प्रकार (RTO) पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या निर्दशनास आल्याने अधिकाऱ्यांनी फिर्याद दिली,
या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हडपसर येथील चिकन सेंटर मधील खून प्रकरणातील आरोपी गजाआड,
हकीकत अशी की मयुर पुस्तके (रा.हडपसर पुणे )यांच्या मालकीचे फोर्स टेम्पो ट्रॅव्हलर
हे वाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे येथे मोबाईल क्लिनिक व्हॅन या सवर्गात नोंदणी झाली होती,
संजीवनी अॅम्ब्युलन्स सर्व्हिसेस पुणे यांनी मोबाईल क्लिनिक व्हॅनला अॅ्ब्युलन्स असे प्रदर्शित करून रुग्णांकडून प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने विहित केलेल्या
दरापेक्षा जादा भाडे आकारून रुग्णांची व शासनाची फसवणूक केली असल्याचे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील
अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने मोटार वाहन निरीक्षक धनंजय गोसावी यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असल्याने
संबंधिता विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लिटे करत आहे.

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: (NCP Youth Farmers Association )प्रदेश सरचिटणीस पदी मुज्जम्मील शेख
Pingback: (satta matka) व्हॉट्सअपव्दारे मटका घेणा-या महिलेस पोलीसांनी घेतले ताब्यात
Pingback: (Kondhwa murder case) कोंढव्यात युवकाचा भर रस्त्यात सपासप वार करून खून