जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा : ५ जणांना अटक
Police raid :जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा : ५ जणांना अटक,

Police raid : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुणे शहरात अवैध धंद्यांना बंदी असतानाही राजरोसपणे चालणा-या अवैध धंद्यावर पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेकडील पोलीस हवालदार कुमावत यांना (हडपसर रामनगर झोपडपटटी रेल्वे गेट जवळ वानवडी, पुणे)
येथे बेकायदेशीर जुगार अड्डा चालु असल्याबाबत गोपनीय माहीती मिळाली ,
माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (सामाजिक सुरक्षा विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ शहानिशा करुन
(रामनगर झोपडपटटी, रेल्वे गेट जवळ, वानवडी, पुणे) येथे चालु असलेल्या बेकायदेशीर सोरट जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला.
आमदार चंद्रकांत पाटलांच्या नावाने नागरिकांना पुन्हा गंडा
त्यात ८,९५०/- रु. किंमतीचा माल त्यामध्ये रोख रक्कम व जुगाराचे साहीत्य असा माल जप्त करुन जुगार घेणारे व खेळणारे असे एकुण ५ आरोपींन विरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोद करण्यात आला आहे.
व आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. कारवाई, अप्पर पोलिस आयुक्त गुन्हेचे अशोक मोराळे , पोलीस उपआयुक्त गुन्हेचे बच्चनसिंग,
पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रिया टिळेकर, पोलीस हवालदार कुमावत, पोलीस शिपाई कोळगे, भांडवलकर व गायकवाड यांनी केली आहे.

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: (bibwewadi police inspector suspended )निरीक्षक मुरलीधर खोकले निलंबित