पुण्यात तरुणीवर सामूहिक बलात्कार, घटनेने पुणे हादरले.
(Pune girl gang raped) क्राईम ब्रांच न्यूज प्रतिनिधी पुणे :
सदरील घटना पुण्यातील जनता वसाहत परिसरामध्ये घडली आहे.
२५ वर्षीय पीडित तरुणी काल सायंकाळी स्वारगेटवरून कात्रजला आपल्या घरी जात होती.
यावेळी आरोपीने ‘तुला घरी सोडतो’ असे खोट सांगून पीडित तरुणीला जनता वसाहतीत नेले.
याठिकाणी चार जणांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला.
श्रीकांत सरोदे,आदित्य पवार, दुर्वेश जाधव व आशिष उर्फ राड्या मोहिते असे ४ नराधमांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २५ वर्षीय पीडित तरुणी मतिमंद आहे.
वाचा : चोराची कमाल पोलिस ठाण्याजवळील चोरला माल
काल सायंकाळी पाचच्या सुमारास ती स्वारगेटवरून आपल्या घरी कात्रजला जात होती.
पूर्वीपासून आरोपींची तिच्यावर करडी नजर होती.
पीडित तरुणी मतिमंद असल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपीने तिला ‘घरी सोडतो’ असे खोट सांगितले.
तरुणीनंही नराधमांवर विश्वास ठेवला.
परंतु आरोपींनी तिला कात्रजला घेऊन जाण्याऐवजी आपल्या घरी जनता वसाहत परिसरात नेले.
याठिकाणी नराधमांनी पीडितेवर सामूहिक अत्याचार केला .
या घटनेची माहिती समोर येताच परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
संबंधित आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत.
वाचा : गरुडझेप शिवज्योत मोहीम पुण्यात दाखल ;

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822