आमदार चंद्रकांत पाटलांच्या नावाने नागरिकांना पुन्हा गंडा
MLA Chandrakant Patil issue : मी तुमच्या भागातील आमदार बोलतोय म्हणत लाख रुपयांची फसवणूक,

MLA Chandrakant Patil issue : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : कोरोना संक्रमणाचा फायदा घेत देणगीच्या स्वरुपात खंडणी मागणारी टोळी सक्रिय झाली आहे.
आता थेट आमदारांच्या नावानेच फोन करून पैसे उकळण्याचा प्रकार समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाने निगडी येथील एका डॉक्टरला खंडणी मागितल्याची घटना घडली होती,
ती घटना ताजी असतानाच पुन्हा चंद्रकांत पाटील यांच्या नावाने एका व्यवसायिकाकडे खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आली आहे.
या संदर्भात एका ९० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
खंडणी मागणा-या 12 वर्षीय मुलाच्या खुनातील आरोपींना अटक
१७ जुलै रोजी फिर्यादी हे त्यांच्या वर नमुद पत्त्या वरील ऑफीस मधे असतांना यातील आरोपींनी फिर्यादी यांचे मोबाईल नंबर वर फोन करुन सांगीतले की
“नमस्कार साहेब ओळखले का मी आमदार चंद्रकांत पाटील बोलतोय, तुमच्या कोथरुड भागातुन मी निवडुन आलोय.
सध्या कोरोना महामारीच्या काळामध्ये मी खुप मदतकार्य केले असुन या पार्श्वभुमीवर तुंम्ही मला २ ते ३ लाख रुपयांची आर्थीक मदत द्या.
असे बोलणे करुन पैश्यांची मागणी करुन त्यांना आमदार चंद्रकांत पाटील हे बोलत असल्याची भासवुन तोतयेगिरी करुन १००,०००/- रुपये देणेस भाग पाडले
आणि साथीदारांचे मदतीने फिर्यादी यांची फसवुणक केली आहे सदरील प्रकरणाचा पुढील तपास अलंकार पोलीस ठाणे करीत आहे.
सत्तेची चव आणि सत्तेची हाव अत्यंत वाईट असते

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: (Police raid ) जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा : ५ जणांना अटक