टेम्पो चोर पोलिसांच्या ताब्यात
चोराकडून 14 गुन्हे उघड ः वानवडी पोलिसांची उत्तम कामगिरी
Crime Branch News: पुणे, दि. 10 : रस्त्यावर उभा केलेला टेम्पो चोरून नेणाऱ्याला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे.
राहुल छगन फडतरे (वय 24, रा. कानिफनाथ पायथा, वडकी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वानवडी पोलिसांनी आरोपीकडून 14 गुन्हे उघड करीत मुद्देमाल जप्त केला आहे. वानवडी पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी अतिक महेबुब सय्यद (रा. अंजुमन मस्जीदशेजारी, रामटेकडी) यांनी 31 मे रोजी रामटेकडी येथील अण्णा भाऊ साठे उद्यान येथे टेम्पो उभा केला असताना चोरट्यांनी तो पळवून नेला होता.
टेम्पो चोरून नेणाऱ्याची पोलिसांना सूत्रांकडून माहिती मिळाली.
त्यानुसार वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली.
यावेळी आरोपीकडून गुन्ह्यातील टेम्पो हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीवर चंदननगर, कोंढवा, हडपसर, डेक्कन व भोसरी येथे तब्बल 14 गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे.