पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांचे स्वयंशिस्तीचे पालन करण्याचे नागरिकांना आवाहन
Police Commissioner appeal : 2 हजारांपेक्षा पुणेकरांवर कारवाई.
![Police Commissioner appeal to citizens](http://crimebranchnews.com/wp-content/uploads/2019/12/pune-police-inspector-transfers.jpg)
Police Commissioner appeal : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत चालली असल्याने सर्वत्र चिंता वाढली आहे.
शासनाने घालून दिलेले नियम नागरिकांकडून पाळले जात नसल्याने शासनाकडून कडक पावले उचलली जात आहे.
शहरात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या पुणेकरांवर पुणे पोलिसांनी कारवाईचा फार्स आवळला आहे.
विना मास्क फिरणाऱ्या २ हजार पेक्षा जास्त जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या पुढेही कारवाई अशीच सुरू राहणार असून नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन करावे ,
तसेच शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याचे पुणे पोलिस आयुक्त के व्यंकटेशम यांनी अव्हान केले आहे.