लॉकडाऊनमध्ये पकडलेली बस सोडण्यासाठी घेतलेल्या लाचप्रकरणी बिबवेवाडी पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले निलंबित
Bibwewadi police inspector suspended : राजलक्ष्मी ट्रॅव्हल्सच्या बसचालकाकडून ५० हजार रुपये घेणा-या सुखदेव भिमदान चारण याला अटक केल्यानंतर निरिक्षकाचे नाव उघड
Bibwewadi police inspector suspended : पोलीस न्यूज24 प्रतिनिधी : पुणे : लॉकडाऊनच्या काळात पकडलेली बस सोडविण्यासाठी पोलीस
निरीक्षकाच्या सांगण्यावरुन
५० हजार रुपये घेण्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील गुन्हे निरीक्षकाला पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी निलंबित केले आहे.
मुरलीधर रामराव खोकले असे या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणात नरसिंह श्रवणसिंह राजपुरोहित यांनी बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी राजलक्ष्मी ट्रॅव्हल्सच्या बसचालकाकडून ५० हजार रुपये घेणाऱ्या सुखदेव भिमदान चारण याला अटक केली होती.
जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा : ५ जणांना अटक
त्याने पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांच्या सांगण्यावरुन ही रक्कम घेतल्याचे सांगितले होते.
Pingback: (sahyadri hospital) सह्याद्री रुग्णालयात करोनाबाधित महिलेचा विनयभंग