डॉकटरांकडुन बेकायदेशिरपणे खंडणी घेणारी टोळीतील महिलेसह चौघे गुन्हे शाखेकडुन जेरबंद

डॉकटरांकडुन बेकायदेशिरपणे खंडणी घेणारी टोळीतील महिलेसह चौघे गुन्हे शाखेकडुन जेरबंद

पुणे शहरातील हडपसर भागातील घटना

पोलीस न्यूज 24 : पुणे हडपसर येथील एका क्लीनीक मध्ये एक महिला वैद्यकिय तपासणीसाठी पेशंट म्हणुन काही दिवसांपूर्वी

डॉकटरांकडे गेली होती डॉक्टरांनी तिला पेंशट म्हणून तपासात असताना पेशटंने मुद्दाम आरडा-ओरडा केला त्यावेळी बाहेर

थांबलेल्या तिचे साथीदार लोंकाना आत बोलावुन व डॉंक्टरांना धक्काबुक्की करुन त्यांना व त्याचे सहकारी डॉक्टर यांना आम्ही

पोलीस आहोत असे सांगुन त्यांना जबरदस्तीने त्यांचेकडील स्वीप्ट कार मध्ये बसवुन किडनॅप करुन सासवडचे दिशेने पळवुन

नेले, त्यांनंतर पुन्हा हडपसर रोडवरील एका ऑफिस मध्ये डांबून ठेवले त्याठिकाणी सदर डॉक्टर यांना दोन इसमांनी आम्ही

पत्रकार आहोत. असे सांगुन तुमच्यावर पोलीसा केस झाली तर तुमची व तुमच्या हॉस्पीटलची बदनामी होईल त्यापेक्षा तुम्ही सदर

प्रकरण तात्काळ मिटवुन घ्या असे सांगुन, त्या सर्वांनी शिवीगाळ करुन, मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देवून प्रकरण

मिटवण्याकरिता त्यांचेकडे १० लाख रुपयांची खंडणीची मागणी करुन त्यांना तडजोडी अंती ७ लाख रुपये देण्याचे डॉक्टरांनी

मान्य केले. डॉक्टरांना लॉकडाऊन मुळे इतकी रक्कम जमा करता आली नाही त्यांनी त्यांचे सहकारी डॉक्टरांनी लॉकडाऊनचे

काळात त्यांचे नातेवाईक व मित्रमंडळी यांचेकडून गोळा करुन आरोपींना दिल्या नंतर त्याची आरोपींनी सांयकाळी साडेचार

🖕 Click Here

वाजता सुटका केली होती. सदर प्रकारामुळे संबधित डॉक्टर हे खुपच घाबरले होते व तणावाखाली होते त्यांनी आपले जवळील

पोलीस मित्रांशी संपर्क साधला व सदर घटनेची माहीती दिली त्यावेळी पोलीसांनी त्यांना धीर दिला त्यावेळी त्यांचे मनातील

भिती गेल्यानंतर त्यांनी पोलीसांकडे तक्रार दिलेली आहे. सदर प्रकरणी अशा सात जणांविरुध्द हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा

दाखल करण्यात आला आहे दाखल गुन्हयात सहभागी असलेला प्रदिप ज्ञानदेव फासगे वय ३७ रा – प्रिझम सोसायटी मांजरी पुणे,

समीर जगन्नाथ थोरात हडपसर पुणे,आरती प्रभाकर चव्हाण वय-२९ रा पॉवर हाऊस एकनाथ पुरम सोसायटी फुरसुंगी पुणे

यांना ताब्यात घेण्यात आले आहे. समीर जगन्नाथ थोरात हा पुणे शहर पोलीस दलात कर्तव्यावर असलेला कर्मचारी आहे.सदर

गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहीते करीत आहेत.सदरची कामगिरी ही गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त

अशोक मोराळे,पोलीस उपायुक्त बच्चनरसिंग, सहायक पोलीरा आयुक्त शिवाजी पवार, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक

राजेंद्र मोहिते, पोलीस उप निरी. संजय गायकवाड, यांनी कामगिरी केली आहे.

🖕 Click Here