महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिला जिवंत जाळणाऱ्या चारही नराधमांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी


🖕 Click Here

Priyanka reddy hyderabad case : चारही नराधमांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे

priyanka-reddy-hyderabad rape and murder case

Priyanka reddy death case : police news24 :

हैदराबाद  मधील सरकारी पशू वैद्यकीय रुग्णालयातील महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिला जिवंत जाळल्याची दोन दिवसापूर्वी घटना घडल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे

याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना काल न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चारही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली ,

Advertisement

या आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने जनतेतून मात्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.

काल या चारही आरोपींना कडक पोलीस बंदोबस्तात शादनगर पोलीस ठाण्याहून चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले.

या चारही आरोपींवर सामुहिक बलात्कार आणि हत्येचा आरोप आहे .

Advertisement

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा मुलगा आणि मंत्री के. टी. रामा राव यांनी सांगितले की या प्रकरणी मी स्वतः लक्ष घालणार .

या हत्याकांड प्रकरणी न्यायालयाने चारही आरोपींना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे असे देशभरातील सर्व नागरिकांचे मत आहे.

पण न्यायालयाने या नराधमांना 14 दिवसांची कोठडी सुनावल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Advertisement

इतर बातमी : स्वतःच्या 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापाला पोलिसांनी केले अटक

Police News 24 / पुणे ; September 28, 2019 ; Market yard police : स्वतःच्या 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 35 वर्षीय नराधम बापाला मार्केटयार्ड पोलिसांनी अटक केले आहे.

मागील 3 वर्षापासून घरामध्ये कोणी नसताना किंवा झोपल्यानंतर तो हे दुष्कृत्य करत होता.

या घटने प्रकरणी एका 42 वर्षीय महिलेने मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

🖕 Click Here
Advertisement

त्यानुसार आरोपीच्या विरुद्ध बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाळेमध्ये लैंगिक अत्याचाराच्या विषयासंदर्भात माहिती देतांना हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या समुपदेशक असून ते अनेक शाळांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या संदर्भात जनजागृती करून माहिती देण्याचे काम करत असतात.

Advertisement

दरम्यान अशाच प्रकारचे समुपदेशन त्या एका शाळेत करत असताना एक 13 वर्षाची मुलगी रडत होती.

तेव्हा फिर्यादीने मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.

3 वर्षापासून तिचे वडील आपल्यावर अत्याचार करत असल्याचे मुलीने फिर्यादीना सांगितले.

Advertisement

त्यानुसार पीडित मुलीने दिलेल्या जबाबावरून मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर घटनेत बिबवेवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांचे मोलाचे सहकार्य घेत,

मार्केटयार्ड पोलिसांनी नराधम बापास अटक करून न्यायालयाच्या समक्ष हजर केले असता न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

Advertisement

मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी निंबाळकर यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद खटके हे सदरील घटनेचा तपास करत आहेत.

🖕 Click Here

2 thoughts on “महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिला जिवंत जाळणाऱ्या चारही नराधमांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Comments are closed.