येरवडा कारागृहातून कैदी पुन्हा पळाले

Yerawada Jail News : कारागृहाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण?

prisoner-escapes-from-yerawada-jail
संग्रहित फोटो

Yerawada Jail News : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुणे येरवडा कारागृहातून पुन्हा एकदा पाच आरोपी पळून गेल्याची घटना घडली असून येरवडा मध्यवर्ती

कारागृह प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमी तात्पुरत्या स्वरूपाचे कारागृह सुरू केले आहे .

यातूनच मोक्कासह गंभीर गुन्ह्यातील पाच आरोपी गुरुवारी पहाटे खिडकीचे गज तोडून पळून गेल्याची घटना घडली आहे.

लॉकडाऊन झाल्या पासून ही चौथी घटना आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर न्यायाधीन बंदी तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात येत आहेत.

तात्पुरता अटक पुर्व जामिन मिळालेल्या आरोपींना हायकोर्टाचा दिलासा,

सतत आरोपी पळून जाण्याच्या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. देवगण अजिनाथ चव्हाण,

गणेश आजिनाथ चव्हाण( दोघेही रा.बोरावके नगर, तालुका दौंड, पुणे), अक्षय कोडक्या चव्हाण,(रा.लिंगाळी माळवाडी, तालुका दौंड, पुणे),

अजिंक्य उत्तम कांबळे (रा.सहकार नगर टिळेकर वाडी), देवगन, गणेश, अक्षय हे तीनही दौंड पोलिसांनी मोक्याच्या गुन्ह्यात अटक केलेले आहेत.

अजिंक्य याच्यावर लोणीकाळभोर तर सनी याच्यावर वाकड पोलिस ठाण्यात पोलिसांनी मोक्याच्या गुन्ह्यात अटक केलेले आहेत.

अरजिंक्य याच्यावर लोणीकाळभोर तर सनी याच्यावर वाकड पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

🖕 Click Here

गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास येरवडा येथील जात पड़ताळणी कार्यालयाच्या आवारातील तात्पुरत्या कारागृहाच्या इमारत क्रमांक ४ च्या पहिल्या

मजल्यावरील खोली क्रमांक ५ मधील खिड़कीचे दोन गज उचकटून तोडून टाकून ५ आरोपी पळून गेल्याचा प्रकार बंदोबस्तावरील पोलिसांच्या लक्षात आला.

लाॅकडाउन मध्ये पुणे पोलिसांची अशी हि सेवा

येरवडा तात्पुरत्या कारागृहात सध्या एकूण ५६८ न्यायाधीन बंदी ठेवण्यात आलेले आहेत.

बंदी पळून जाण्याच्या वारंवार होणार्या घटनांमुळे सध्या पुणे पोलीस आयुक्तालय कडील दोन अधिकारी, बारा कर्मचारी,

कारागृह विभागाचा एक अधिकारी व १८ कर्मचारी असा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

मात्र तरीदेखील बंदी पळून जाण्याच्या घटनांचे सत्र सुरूच आहे.या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदकरण्यात आले आहे.

समाज माध्यमातील अफवेने गरोदर मातांच्या चिंतेत वाढ

🖕 Click Here