सय्यदनगर भागातील डेव्हलोपर्सवर फसवणूकीचा गुन्हा दाखल
fraud case: सय्यदनगर भागातील जागा डेव्हलोपर्स च्या संचालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

fraud case : Police News24 : आर.एफ. सय्यद वय 38 ,यांचे जागा खरेदी विक्रीचे व्यवसाय आहे,
यांनी जागे संदर्भात शेख यांच्याशी दौंड व हडपसर येथील जागेचे व्यवहार केले होते.
ते व्यवहार पूर्ण न झाल्याने त्यांनी शेख यांना त्यांच्या नावाचे व त्यांच्या पत्नीच्या नावाचे चेक दिले होते,
ते चेक बाऊन्स झाल्याने तसेच फसवणूक झाल्याने शेख यांनी याच्या विरोधात लष्कर न्यायालयात दावा दाखल केला होता.
त्या संबंधी लष्कर न्यायालयाने वानवडी पोलिसांना तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते,
त्या तपासात सय्यद व त्यांच्या पत्नी दोषी आढळल्याने त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला,
सदरिल प्रकरणी दोघांना लष्कर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांंना मेजिस्टेड कस्टडी देऊन त्यांची रवानगी जेलमध्ये केली.
याप्रकर्णाचा तपास महम्मदवाडी चौकीचे पोलीस उपनिरीक्षक संदीप वरपडे करत आहे.
इतर बातमी : महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिला जिवंत जाळणाऱ्या चारही नराधमांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

police news24 : Priyanka reddy hyderabad case :
चारही नराधमांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे
हैदराबाद मधील सरकारी पशू वैद्यकीय रुग्णालयातील महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिला जिवंत जाळल्याची दोन दिवसापूर्वी घटना घडल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे
याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना काल न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चारही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली ,
या आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने जनतेतून मात्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.
काल या चारही आरोपींना कडक पोलीस बंदोबस्तात शादनगर पोलीस ठाण्याहून चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले.
या चारही आरोपींवर सामुहिक बलात्कार आणि हत्येचा आरोप आहे .
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा मुलगा आणि मंत्री के. टी. रामा राव यांनी सांगितले की या प्रकरणी मी स्वतः लक्ष घालणार .
या हत्याकांड प्रकरणी न्यायालयाने चारही आरोपींना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे असे देशभरातील सर्व नागरिकांचे मत आहे.
पण न्यायालयाने या नराधमांना 14 दिवसांची कोठडी सुनावल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
इतर बातमी वाचा : स्वतःच्या 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापाला पोलिसांनी केले अटक

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822