मंडल अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले रंगेहात,
Anti corruption bureau news : १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले,
Anti corruption bureau news : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :
लॉकडाऊनच्या काळातही सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुसंडी मारलेली आहे.
काही ना काही कारणाने चिरीमिरी घेऊन स्वताला साव समजणा-यांची संख्या काही कमी नाही.
पुणे जिल्ह्यातील शिरूर भागातील एका मंडल अधिकाऱ्यास १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
यामुळे शिरूर परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आले आहे.
वाचा : ये तु कुठे चाललाय असे म्हणत खिशातील मोबाईल चोरत चोरटे झाले पसार,
वाळू चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच त्या संबंधित कारवाई न करण्यासाठी लाच घेतल्या प्रकरणी अमोल निवृत्तीनाथ जाधव वय ४० असे पकडण्यात आलेल्या अधिका-याचे नाव असून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.
जाधव हे तहसील कार्यालयात शिरूर तालुक्यातील पाबळ विभागाचे मंडल अधिकारी आहेत. जाधव लाचेची मागणी करत असल्याची तक्रार होती.
त्यावेळी जाधव यांनी तक्रारदार यांना वाळू चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच त्या संबंधित कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितली.
याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली.
लाच मगितल्याचे निष्पन्न झाल्याने आज दुपारी अमोल जाधव यांना तडजोडीअंती तक्रारदार यांच्याकडून १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.
VIDEO l पुणे मनपाच्या कर्मचा-यांकडून गणेश मुर्ती ची हेळसांड

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822