मोक्काच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्याला मुंबई उच्च न्यायालयाने दिला ४५ दिवसांचा तात्पुरता जामीन

(Interim bail to Mocca accused ) मंगेश शाम सातपुते असे त्याचे नाव आहे .

(Interim bail to Mocca accused ) पुणे :

मोक्काच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्याला मुंबई उच्च न्यायालयाने ४५ दिवसांचा तात्पुरता जामीन मंजूर केला आहे .

त्याच्या आईला कर्करोग झाला आहे .

आरोपीच्या आईची स्थिती गंभीर असून , अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याचे बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

त्यानुसार न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी हा निकाल दिला आहे . मोक्कामध्ये तात्पुरत्या जामिनाची तरतूद नाही .

मात्र, तो सहा वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत आहे.

मंगेश शाम सातपुते असे त्याचे नाव आहे . सातपुतेच्या वतीने अॅड . जैद अन्वर कुरेशी आणि अॅड . इब्राहिम अब्दुल शेख यांनी काम पाहिले .

वाचा : भाजपाचे नगरसेवक धिरज घाटे यांच्या हत्येचा कट उघडकीस, ३ जणांना अटक.

त्यांना अश्रफ आख्तर शेख आणि अफरोझ इब्राहिम शेख यांनी सहकार्य केले.

🖕 Click Here

आरोपीला खडक पोलिसांनी  मोक्काच्या गुन्ह्यात अटक केली आहे .

मोक्का कायदा १९९९ मध्ये अस्तित्वात आहे . तेव्हापासून आजपर्यंत कोणालाही तात्पुरता जामीन दिला गेलेला नाही .

या प्रकरणात आरोपीच्या आईची स्थिती खूपच गंभीर असून, याबाबतची कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली .

मोक्काच्या गुन्ह्यामध्ये तात्पुरत्या जामिनाची तरतूद नसली , तरीही तात्पुरता जामीन मंजूर करण्यास कोणतीही स्पष्ट बंदी नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला .

त्यानंतर त्याला काही अटी आणि शर्तीवर तात्पुरता जामीन देण्यात आला.

वाचा : टँकर मधुन ऑईल चोरी करुन त्यामध्ये काळया रंगाची भेसळ करणारी टोळी गजाआड,

🖕 Click Here

One thought on “मोक्काच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्याला मुंबई उच्च न्यायालयाने दिला ४५ दिवसांचा तात्पुरता जामीन

Comments are closed.