एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्पातील कनिष्ठ लिपीक महिलेला लाच घेताना अटक,


🖕 Click Here

(Integrated Child Development Scheme) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले रंगेहाथ.

(Integrated Child Development Scheme) क्राईम ब्रांच न्यूज (प्रतिनिधी) :

प्रवास भत्ता बिल मंजूर केल्याचा मोबदला म्हणून लाचेची मागणी केल्याप्रकरणी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कनिष्ठ लिपिक महिलेला रंगेहाथ पकडल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

Advertisement

एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प कार्यालय, मुळशी (जिल्हा परिषद अंतर्गत)

येथील कनिष्ठ लिपिक महिला सीमा विद्याधर विपट (वय ४७ वर्षे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कनिष्ठ लिपिक महिलेचे नाव आहे.

वाचा : गोळीबार करुन फरार झालेल्या आरोपीस गुन्हे शाखेने केले जेरबंद

Advertisement
integrated-child-development-scheme-junior-clerk-arrested-for-taking-bribe

त्या संदर्भात एका २६ वर्षीय पुरूषाने तक्रार दिली आहे.यातील तक्रारदार हे त्या विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत असून

🖕 Click Here

त्यांचे प्रवास भत्ता बील मंजुर केल्याचा मोबदला (टक्केवारी प्रमाणे) म्हणून आरोपी लोकसेवक विपट यांनी तक्रारदार यांच्याकडे ३ हजार ४५० रुपये लाचेची मागणी केली होती.

आणि ती कार्यालयात स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे.

Advertisement

त्या संदर्भात पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल क्षीरसागर हे करत आहेत.

video पहा : सय्यदनगरमध्ये दोन गटात हाणामारी. तलवारी-कोयते नाचवत घातला धुमाकूळ,

Advertisement
🖕 Click Here