माजी नगरसेविका रुपाली पाटील यांच्यावरील कारवाई न्यायालयाने फेटाळली,
Rupali Patil News : शिवाजीनगर पोलिसांनी केले होते न्यायालयात हजर.
Rupali Patil News : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :
पुणे शहरात सध्या कोरोना ने पुन्हा डोके वर काढले आहे. तर पुणेकरांमध्ये भितीचे वातावरण आहे.
त्यात सुविधा उपलब्ध होत नसल्याने काहींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
असाच आंदोलनाचा पवित्रा माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यातील शिवाजीनगर येथे उभारण्यात आलेल्या जंम्बो कोविड रुग्णालय येथील गेटवर चढून घेतला होता.
सदरील घटने संदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्याने रुपाली ठोंबरे पाटील यांच्या विरोधात कारवाई करून स्थानबद्धतेसाठी न्यायालयात हजर करण्यात आले होते.
ती कारवाई न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
वाचा : पुण्यातील एका फायनान्स कंपनीच्या स्वच्छतागृहात कॅमेरा लावण्यात आल्याने खळबळ,

हकीकत अशी की शिवाजीनगर येथील सीओईपी मैदानावर कोरोना रुग्णांसाठी बांधण्यात आलेल्या जंम्बो सेंटरच्या कारभाराविरोधात
माजी नगरसेविका व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहरअध्यक्षा रुपाली ठोंबरे पाटील यांनी ५ सप्टेंबर रोजी आंदोलन केले होते.
त्यावेळी रुपाली पाटील या गेटवर चढून आत गेल्या होत्या. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी त्यांना अटक करुन न्यायालयात हजर केले.
त्यांच्यावर यापूर्वी खडक, विश्रामबाग ,हिंजवडी, बिबवेवाडी, डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
शरीरा विरुद्ध व दंगा मारामारीचे गुन्हे दाखल असून त्यांच्या विरुद्ध प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांच्यमध्ये काहीही सुधारणा झाली नाही.
पाटील यांच्याकडून यापुढे अशा प्रकारचे कृत्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाचा : ३ हजाराची लाच घेताना पोलिसाला अॅन्टी करप्शने केली अटक,
त्यामुळे त्यांच्याकडून कायदा व सुव्यवस्थेचा भंग होण्याची दाट शक्यता वाटत असल्याने त्यांना ८ ते २१ सप्टेंबर पर्यंत १४ दिवसांसाठी स्थानबद्ध करण्याबाबत आदेश देण्याची विनंती न्यायालयात करण्यात आली.
राजकीय कार्यकर्त्यांवर गुंडाविरोधात करायची कारवाई केल्याने त्याचा सोशल मीडियावर निषेध होऊ नये यासाठी न्यायदंडाधिकारी ए.एस. राणे यांनी पोलिसांची कारवाई फेटाळून लावली आहे.
रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या, जंम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्णांचे मृत्यू होत आहेत. एका पत्रकाराला आपला जीव गमवावा लागला आहे.
अशावेळी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार पोलिसांमार्फत करत आहे. त्याचा आम्ही निषेध करतो.
Hinglish News: Maharashtra me Teesri baar huwa CoviD-19 test ka Price kam

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822