भाजपाचे नगरसेवक धिरज घाटे यांच्या हत्येचा कट उघडकीस, ३ जणांना अटक.


🖕 Click Here

येत्या निवडणुकीमुळे करण्यात येणार होती हत्या?

क्राइम ब्रांच न्युज प्रतिनिधी पुणे : पुण्यातील भाजपाचे नगरसेवक व माजी सभागृह नेते धिरज घाटे यांच्या हत्येचा कट उघडकीस आला आल्याने पुणे शहरात खळबळ उडाली आहे.

निवडणुकीस काही महिने राहिले असल्याने असा प्रकार उघडकीस आल्याने चर्चेला उधाण आले आहे.

याप्रकरणी नगरसेवक धिरज घाटे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्या तक्रारीवरून विकी उर्फ वितुल वामन क्षिरसागर, मनोज संभीजी पाटोळे (रा. सानेगुरूजी नगर आंबीलओढा कॉलनी) या
दोघांसह त्यांच्या तीन ते चार साथीदारांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.

Advertisement

सदरिल घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास शेफ्रॉन हॉटेल नवी पेठ शास्त्री रोड परिसरात घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार,धिरज घाटे शुक्रवारी दुपारी चहा पिण्यासाठी शेफ्रॉन हॉटेलमध्ये गेले होते.

त्यावेळी त्यांचा जुना
कार्यकर्ता विकी क्षिरसागर हा देखील त्याच्या काही साथीदारांसोबत तेथे
आला होता.

Advertisement

धिरज घाटे यांचे कार्यकर्ते क्षिरसागर बरोबर संपर्क ठेवत नाहीत,

🖕 Click Here

बरोबर जात नाहीत म्हणून तो मागील काही दिवसापासून चिडून होता.

दरम्यान आगामी कालावधीत होणाऱ्या महापालिकेच्या नगरसेवक
पदाच्या निवडणूकीत त्याचा भाऊ राकेश क्षिरसागर हा सहज निवडून
यावा म्हणून ४ ते ५ साथीदारांना एकत्र करून धिरज घाटे यांच्या खूनाचा कट रचून शेफ्रॉन हॉटेलमध्ये त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आला होता.

Advertisement

याबातची माहिती धिरज घाटे यांना मिळाल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता हा प्रकार समोर आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

त्यानुसार पाच ते सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
🖕 Click Here