घोरपडे पेठेतील खंडणी बहाद्दरांवर खडक पोलिसांची कारवाई

(Khadak police action) तीन आरोपींना अटक करून न्यायालयात केले हजर

(Khadak police action) क्राईम ब्रांच न्यूज प्रतीनिधी पुणे :

खडक पोलीस स्टेशन हद्दीत काही गुन्हेगार प्रवृत्तीचे तरुण डिंगडॉंग करून नागरिकांना त्रास देण्याचे काम करत होते,

लोकांना धमकावणे, शिवीगाळ करणे, हफ्ता मागणे असे उद्योग चालू होते ,

असाच एक प्रकार यांनी गुरुवार पेठेत चिकन सेंटर चालविणा ऱ्या सोबत करण्याचा प्रयत्न केला ,

अल हम चिकन सेंटर नावाचे दुकानात फिर्यादी व त्यांचे भाऊ दुकानात हजर असताना ,

आरोपी यांनी संगनमत करून , फिर्यादी यांच्या दुकानात येवुन मोठ-मोठ्याने शिवीगाळ करुन त्यांना जीवे मारण्याची धमकी देवुन त्यांच्याकडे ५,००० / – रुपयाची खंडणी मागितली.

त्याच्या या कृत्याला चिकन सेंटर चालकाने भिक घातली नाही ,

व घडलेला सर्व प्रकार जाऊन खडक पोलीसांना सांगून रीतसरपणे फिर्याद दिली .

वाचा : मोक्काच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्याला मुंबई उच्च न्यायालयाने दिला ४५ दिवसांचा तात्पुरता जामीन

🖕 Click Here

गुन्हा नोंदवून होताच खडक पोलिसांनी तत्काळ जाऊन या खंडनी बहाद्दरांना शोधून त्यांच्या मुसक्या आवळल्या .

अटक आरोपी मध्ये झैद ऊर्फ लंगड्या जमीर दलाल (वय -२० , रा.घोरपडी पेठ पुणे)

उमेर आसीफ अन्सारी , (वय -२२ , रा.गंजपेठ पुणे ( अटक )

इतरांवर भा.द.वि.कलम ३८६,५०४,५०६,३४ , महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ ( १ ) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंदवून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले .

पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत गोसावी करत आहे.

वाचा : WhatsApp युजर्सला मोठा झटका ! लवकरच ‘या’ ४३ स्मार्टफोन वर Whatsapp चालणार नाही

🖕 Click Here