कोंढव्यातील महिला गुन्हेगारावर ‘एमपीडीए’ची कारवाई;
(MPDA action against female) सराईत महिलेला स्थानबद्ध करुन येरवडा जेलमध्ये पाठवलं
(MPDA action against female) क्राईम ब्रांच न्यूज (प्रतिनिधी) : पुणे :
पुरुष गुन्हेगारावर कार्यवाही सुरूच असताना आता महिला गुन्हेगारांवर ही पुणे पोलीस आयुक्तांनी कार्यवाहीचा शुभारंब केला आहे .
कोंढवा परिसरात गुन्हेगारी कृत्य करणार्या सराईत महिला गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
रेश्मा बापू भालशंकर (वय 45, रा. कोंढवा खुर्द, सध्या रा. अंतुलेनगर, येवलेवाडी) असे या महिलेचे नाव आहे.
महिला गुन्हेगारावर प्रथमच एमपीडीए अन्वये कारवाई करुन स्थानबद्ध करण्यात आले आहे.
रेश्मा ही पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.
Pingback: ( CRED APP ) मध्ये माहिती भरायला लावत ३ लाखांची केली फसवणूक,