मनसेच्या कसबा उपविभाग अध्यक्षावर तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल,
Case file :पाणी द्या- पाणी द्या अश्या घोषणाबाजी करत मनसे स्टाईलने आंदोलन,
Case file : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :
स्वारगेट पाणी पुरवठा विभागाच्या परिसरातील नागरिकांनी पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याच्या कारणावरून पाणी द्या- पाणी द्या अश्या घोषणाबाजी करत आंदोलन केले .
आंदोलन केल्या प्रकरणी मनसेच्या कसबा उपविभाग अध्यक्ष संग्राम सुभाष तळेकर यांच्या सह ४ जणांविरुद्ध स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा : पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेऊन पत्नीची हत्या
स्वारगेट येथील पाणीपुरवठा विभागात पाण्यासाठी आंदोलन करताना कार्यालयाची तोडफोड,
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि शासकीय वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आहे.

याप्रकरणी आतिश जाधव वय ५०, रा. चिंतामणीनगर हडपसर यांनी फिर्याद दिली आहे.
स्वारगेट पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयात शिरून स्टाफला पाणी पिण्यासाठी ठेवण्यात आलेला माठ शासकीय वाहनावर फोडण्यात आला.
त्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी देण्यात आली.
त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा : मुंबईत येताच कंगनाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: Murder of wife on suspicion of his character