गुटखा विक्री करणारा व्यापारी जेरबंद,

संग्रहित फोटो

१० ऑक्टोबर पर्यंत आरोपीस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश,

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : कोरोनाचा दुरप्रभाव कमी करण्यासाठी शासकीय यंत्रणा दिवसरात्र काम करत असली तरी गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारणाऱ्यांना त्या अधिकाऱ्यांच्या मेहनतीची जाणीव नाही.

लॉकडाऊनचे काळात जिवनावश्यक वस्तु व्यतीसीक्त कोणी सिगारेट, तंबाखु व इतर अमली पदार्थ विक्री करीत असेल तर त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे आदेश असतानाही राजरोसपणे गुटखा विक्री सुरू असल्याने गुन्हे शाखा युनिट १ ने गुटखा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला जेरबंद केले आहे.

पोलीसांना खबर-या मार्फत माहिती मिळाली की हडपसर येथील विमलाई बिल्डिंग काळे पडळ पुणे येथे एका घरात अवैधरित्या गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थाची विक्री चालु आहे.

पोलीसांनी एक बनावट ग्राहक पाठवून खात्री केली व खात्री झाल्यानंतर त्याठिकाणी छापामारला त्यावेळी सदर व्यवसाय करणारा व्यापारी बिजाराम ऊर्फ विजय गणेश देवासी वय-२४ रा- विमलाई विल्डिंग काळे पडळ पुणे,

🖕 Click Here

हा अवैधरित्या गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करीत असल्यांचे आढळुन आला आहे. त्याचे ताब्यातून ८३.९८२/- चा माल बंदी असलेला आरएमडी, विमल गुटखा व तुलसी, व्हिवन व इतर तंबाखूजन्य पदार्थ असा माल जप्त करण्यात आला.

त्याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला लष्कर न्यायालयात हजर केले असता १० ऑक्टोबर पर्यंत आरोपीस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत.

सदरील कारवाई युनिट – १, गुन्हे शाखा, पुणे शहरचे पोलीस निरीक्षक महेद्र जगताप, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत शिंदे,पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस कर्मचारी सचिन जाधव, संजय बरकडे, प्रशांत गायकवाड, बंडू शिंदे , सतिश वर्णवे यांनी केली आहे.

🖕 Click Here