5 लाखांची चोरी करणारा झुरळ्या 2 तासात पोलीसांच्या पिंजऱ्यात.
चोरटयाकडुन ५.२५,०००/- रक्कम हस्तगत.
Crime branch news : एका केक मटेरियलच्या दुकानाचे गल्ल्यातील रोख रक्कम ५,२५,०००/- रुपये चोरी झाल्याची घटना खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीमधिल काशेवाडी भागात घडली होती.
या बाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हाफिजुर रहेमान कयामुद्दीन अन्सारी, (वय ५० वर्षे, धंदा- केक मटेरिअल विक्री, रा. गिरनार क्लासिक सोसा, अॅक्सीस बँकेच्या वरती, नानापेठ, पुणे) यांचा केक मटेरियल विक्रीचा व्यवसाय असुन गेली २५ वर्षापासुन अशोकनगर कॉलणी, काशेबाडी भवानी पेठ, पुणे येथे रिगल एजन्सी नावाने केक मटेरिअल विक्रीचे होलसेल दुकान आहे.
फुकटात बिर्याणी न दिल्याने कोयत्याने हल्ला , फुकट खाउला कोंढवा पोलिसांनी केली अटक
दिनांक १५ ऑक्टबर रोजी दुपारी ३.०० वाजता ते स्वतः दुकान बंद करुन घरी गेले होते. त्यावेळी आठवडयातील व्यवसायातून जमा झालेली रोख रक्कम रु. ५,२५,०००/- मोजुन दुकानातील ड्रावर मध्ये ठेवली होती तसेच शनिवार व रविवार दोन दिवस बँकेला सुट्टी असल्याने बँकेत रक्कम भरणा केली नव्हती.
त्यानंतर दिनांक १६ ऑक्टबर रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ०८.०० वा. दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाचे शटर उचकटलेले दिसले ड्रावर मध्ये ठेवलेली रोख रक्कम रू. ५,२५,०००/- मिळुन आली नाही.
सदरबाबत त्यांनी तात्काळ खडक पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्याने त्यांचे तक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात खडक पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रमांक ३६२/२०२३ भा.दं.सं. कलम ३८०, ४५७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
घरफोडी सारखा गंभीर गुन्हा घडल्याने त्याचा तपास करुन आरोपींचा शोध घेण्यासाठी सुनिल माने, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, खडक पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ सहायक पोलीस निरिक्षक राकेश जाधव व तपास पथकातील अंमलदार, सहायक पोलीस निरिक्षक नितीनकुमार नाईक
व पोलिस नाइक . ७६६१/ तांबोळी, पोलिस शिपाई.८५०० पांडे, पोलिस शिपाई १८०४ शेख यांचे तपास पथक नेमण्यात आले.