सख्ख्या बहिणीची कार चोरून खंडणी मागणाऱ्या आरोपींवर कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल.
गुन्हा दाखल करण्यास लोणावळा पोलीस करत होते टाळाटाळ.
Crime branch news: लोणावळा पुणे :- सख्ख्या बहिणीची कार चोरुन त्याला धमकावून खंडणी मागणाऱ्या भावावर लोणावळा पोलीसांनी गून्हा दाखल केला आहे.
आरोपी नामे सय्यद अब्दुल कादर छोटु कासिम (रा. लोणावळा) व त्याचे दोन मित्र मारुती राक्षे व नफीस शेख (दोघे रा. लोणावळा ता. मावळ जि. पुणे) या तिन्ही आरोपींनी फिर्यादी महिलेची कार बाहेर फिरण्यासाठी मागून नेली होती.
5 लाखांची चोरी करणारा झुरळ्या 2 तासात पोलीसांच्या पिंजऱ्यात.
फिर्यादी महिलेने आरोपी नंबर १ हा सख्खा भाऊ असल्याने विश्वासावर कारचा ताबा भावाकडे दिला होता. त्यानंतर सर्व आरोपींनी संगनमत करुन कार लंपास केली व कार सोडवण्यासाठी फिर्यादीकडे कार परत आणण्यासाठी ५०,०००/- घेतले.
फिर्यादी महिलेने आरोपींना ५०,०००/- रोख दिले व कार परत आणण्यास विनंती केली. ५०,०००/- रु घेवून देखील आरोपींनी कार परत आणली नाही.