जहांगीर हॉस्पिटलमध्ये मुलीला उपचारासाठी दाखल करून रिक्षाने घरी परतत असताना रिक्षात दीड लाखांची रक्कम विसरलेल्या महिलेस काही तासातच खडक पोलिसांनी रक्कम मिळवून दिली.

Crime branch news:

पुणे: एलिझाबेथ रवी (वय 45 वर्ष राहणार भवानी पेठ) यांनी दिनांक १२ October रोजी त्यांच्या मुलीला जहांगीर हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते .

तेथून रिक्षाने घरी येत असताना त्यांची सॅक रिक्षात विसरल्या होत्या . सदर बॅगेत एक लॅपटॉप तसेच मुलीच्या शस्त्रक्रिया करिता लागणारे दीड लाख रोख रुपये होते .

त्यावेळी गस्ती वरील डी.बी . पथकातील अंमलदार यांना सदर महिलेने घडलेला प्रकार सांगितला. विशेष म्हणजे मुलीच्या शस्त्रक्रिये साठी त्यांनी कर्ज घेतले होते .

आणि तीच रक्कम रिक्षात विसरल्याने त्या अतिशय हवालदिल झाल्या होत्या .

फुकटात बिर्याणी न दिल्याने कोयत्याने हल्ला , फुकट खाउला कोंढवा पोलिसांनी केली अटक

सदर महिलेवर ओढवलेला प्रसंग बघून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राऊत तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव यांच्या सूचनेनुसार तपास पथकातील तळेकर,

🖕 Click Here

चव्हाण, वाबळे,कुडले व इतर सर्व डी बी स्टाफ यांनी सुमारे 70 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून सदर रिक्षाचा क्रमांक मिळवून मंगळवार पेठ येथून सदरची ऑटोरिक्षा चालकासह ताब्यात घेतली

व रिक्षातील लॅपटॉप व दीड लाख रोख रक्कम असलेली सॅक वरिष्ठ पोलीस निरीक्षक माने यांच्या हस्ते सदर महिलेच्या स्वाधीन करण्यात आली.

उपचारासाठी कर्ज काढून आणलेली अचानक गहाळ झालेली मोठी रक्कम खडक पोलीसांनी परत मिळवून देताना दाखवलेली संवेदनशीलता व कौशल्य पाहून एलिझाबेथ रवी यांनी खडक व पुणे पोलिसांचे शतशः आभार मानले .

नियमित संभोग करण्याचे फायदे!

🖕 Click Here