फीमेल ची बदनामी केली ई-मेल वर , सोसायटीतील निवडणुकीचा वाद


Crime branch news: पुणे: सोसायटीच्या निवडणुकीत झालेल्या वादातून सभासदांना ई-मेल करुन महिलेची बदनामी केल्याची घटना घडली आहे. जाब विचारणाऱ्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी शेखर बाबुलाल धोत्रे ( रा. कडनगर, उंड्री) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला आणि आरोपी धोत्रे एकाच सोसायटीत राहायला आहेत. सोसायटीच्या निवडणुकीत त्यांच्यात वाद झाले होते.

त्यानंतर धोत्रे याने सोसायटीतील १४० सभासदांना महिलेविषयी बदनानीकारक मजूकर ई मेलद्वारे पाठविला होता. महिलेच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यानंतर महिलेच्या पतीने आरोपी धोत्रेला जाब विचारला. तेव्हा त्याने पतीला मारहाण केली. पोलिसांकडे तक्रार केल्यास मी बघून घेतो, अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

🖕 Click Here
🖕 Click Here