अतिक्रमण हटवल्याच्या रागातून चक्क पोलिसाचे घर पेटवले


🖕 Click Here

Police house news :अतिक्रमण हटवल्याच्या रागातून चक्क कारवाई करणाऱ्या पोलिसांचे घर पेटवले..

encroachment-deletion-destroyed-the-police-house

Police house news : Police news 24 : कोल्हापूर मधील गारगोटी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे ,

अतिक्रमण हटवल्याच्या रागातून काही जणांनी कारवाई करणाऱ्या पोलिसाचे घर पेटवल्याचे समजत आहे.

पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी काही दिवसांपूर्वी अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करत अनधिकृत दुकाने हटवली होती,यावेळी त्यांना धमकावले सुद्धा गेले होते,

Advertisement

त्यांनतर काल 11 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पतंगे यांच्या घराला रॉकेल ओतून आग लावण्यात आली.

याप्रकरणी सुभाष देसाई या संशियत व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आज बुधवारी सकाळी महागाव येथून त्याच्या बहिणीच्या घरातून पोलिसांनी देसाई याला अटक केली आहे.

Advertisement

अधिक माहितीनुसार, देसाई हा गुंड प्रवृत्तीचा आहे. मात्र या विरोधात नागरिकांनी तक्रारी दिल्यास कारवाई करता येईल,

निवडणुकीच्या कामांमध्ये हयगय केल्याने दोनशे शिक्षकांवर गुन्हे दाखल

असे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी सांगितले.

🖕 Click Here
Advertisement

भुदरगड पोलीस कर्मचारी निवासस्थानाच्या आवारात सुभाष देसाई ने अतिक्रमण करून दुकानाचा गाळा सुरु केला होता.

हे अतिक्रमण पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी काढले होते. यामळे सुभाष देसाई याने कर्मचाऱ्यांना धमकी दिली होती,

तसेच रॉकेलचा कॅनही त्याने आणून ठेवला होता. मंगळवारी रात्री 11 वाजता देसाई ने पोलीस कर्मचारी निवासस्थानातील पोलीस निरीक्षक पतंगे यांच्या मोटारीवर रॉकेल ओतून ती पेटवून दिली.

Advertisement

तसेच पोलीस निरीक्षक पतंगे यांच्या घरावरही रॉकेल ओतून ते पेटवून दिले.

आगीमुळे घराच्या काचा फुटल्या व घरातील फर्निचरला सुद्धा आग लागून नुकसान झाले आहे.

या घटनेनंतर देसाई अंधाराचा फायदा घेत पसार झाला होता. बुधवारी सकाळी महागाव येथील त्याच्या बहिणीच्या घरातून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Advertisement

दौंड च्या कब्रस्तानात चालत होता जादूटोणा

🖕 Click Here

2 thoughts on “अतिक्रमण हटवल्याच्या रागातून चक्क पोलिसाचे घर पेटवले

Comments are closed.