आजीला भेटण्यासाठी आला अन पोलिसांच्या हाती सापडला!

(caught by the police) आरोपीवर खुनाचा प्रयत्न , मारामारी , दरोड्याची तयारी , असे तीन गुन्हे दाखल आहेत.

(caught by the police) क्राईम ब्रांच न्यूज :

सात वर्षांपासून मारहाणीच्या गुन्ह्यात फरारी असलेल्या एका आरोपीला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे .

मांगडेवाडी , कात्रज येथे आजीला भेटण्यासाठी तो आला होता .

याच ठिकाणी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

राहुल संजय क्षीरसागर ( मांगडेवाडी , कात्रज ) असे अटक करण्यात आलेल्या फरार आरोपीचे नाव आहे .

त्याच्यावर खुनाचा प्रयत्न , मारामारी , दरोड्याची तयारी , असे तीन गुन्हे दाखल आहेत .

वाचा : शिक्षकाचा आठ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार

विशाल विलास चौधरी यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती .

जुलै २०१५ मध्ये उरुळी देवाची परिसरात पाच ते सहा जण एकाला मारहाण करीत होते .

या वेळी चौधरी हे पाहण्यासाठी गेले असता टोळक्याने त्यांनाही मारहाण केली .

चौधरींच्या डोक्यात , मानेवर दगडाने मारहाण करण्यात आली होती .

यानुसार दाखल गुन्ह्यात यापूर्वी दीपक राठोड , राहुल रंधवे यांना अटक करण्यात आली होती .

मात्र , क्षीरसागर फरार होता . मागील सात वर्षांपासून तो पोलिसांना चकवा देत होता .

🖕 Click Here

दरम्यान , युनिट एकचे पथक हद्दीत गस्त घालत असताना अंमलदार अमोल पवार यांना माहिती मिळाली की ,

क्षीरसागर त्याच्या आजीला भेटण्यासाठी मांगडेवाडीत येणार आहे . त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

पुढील कारवाई कामी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन , पुणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे .

सदर आरोपीवर खुनाचा प्रयत्न , मारामारी , दरोडयाची तयारी असे एकुण ३ गुन्हे भारती विदयापीठ ‘

बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे दाखल आहेत .

वाचा : मुलीला फ्लाईंग किस देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

सदरची कामगिरी श्रीमती भाग्यश्री नवटके ( अति . कार्यभार ) अपर पोलीस आयुक्त , गुन्हे पोलीस उप आयुक्त ,गुन्हे , श्रीनिवास घाडगे ,

सहाय्यक पोलीस आयुक्त , गुन्हे- १/२ लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदशनाखाली युनिट -१ , गुन्हे शाखा ,

पुणे शहरचे पोलीस निरीक्षक शैलेश संखे , पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड ,

सुनिल कुलकर्णी , पोलीस पोलीस अंमलदार अमोल पवार ,

अजय थोरात ,इम्रान शेख , तुषार माळवदकर यांनी केली आहे .

वाचा : दर शनिवारी न्यायालय सुरू,

🖕 Click Here