घोरपडे पेठेतील खंडणी बहाद्दरांवर खडक पोलिसांची कारवाई
(Khadak police action) तीन आरोपींना अटक करून न्यायालयात केले हजर
(Khadak police action) क्राईम ब्रांच न्यूज प्रतीनिधी पुणे :
खडक पोलीस स्टेशन हद्दीत काही गुन्हेगार प्रवृत्तीचे तरुण डिंगडॉंग करून नागरिकांना त्रास देण्याचे काम करत होते,
लोकांना धमकावणे, शिवीगाळ करणे, हफ्ता मागणे असे उद्योग चालू होते ,
असाच एक प्रकार यांनी गुरुवार पेठेत चिकन सेंटर चालविणा ऱ्या सोबत करण्याचा प्रयत्न केला ,
अल हम चिकन सेंटर नावाचे दुकानात फिर्यादी व त्यांचे भाऊ दुकानात हजर असताना ,
आरोपी यांनी संगनमत करून , फिर्यादी यांच्या दुकानात येवुन मोठ-मोठ्याने शिवीगाळ करुन त्यांना जीवे मारण्याची धमकी देवुन त्यांच्याकडे ५,००० / – रुपयाची खंडणी मागितली.