त्या पीडित मुलीवर मुंबईतही लैंगिक अत्याचार

(Sexually abused in Mumbai ) वानवडी पोलिसांनी आरोपीची माहिती मिळवून त्याला मुंबईतून केली अटक.

(Sexually abused in Mumbai ) क्राईम ब्रांच न्यूज प्रतीनिधी :

वानवडी परिसरामध्ये राहणाऱ्या एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर १३ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे .

या मुलीवर मुंबईत गेल्यानंतर ठाण्यातील एका ३० वर्षाच्या तरुणाने तिला घरी घेऊन जाऊन लैंगिक अत्याचार केला असल्याचे उघड झाले आहे .

Advertisement

आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली .

वाचा : घोरपडे पेठेतील खंडणी बहाद्दरांवर खडक पोलिसांची कारवाई

पुणे स्टेशन येथे मित्राला भेटायला गेलेल्या १४ वर्षांच्या मुलीला घरी सोडतो , असे सांगून एका रिक्षाचालकाने रिक्षाने नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता .

Advertisement

त्यानंतर त्याच्या साथीदारांनी तिच्यावर दोन दिवस अत्याचार केले होते .

वानवडी पोलिसांकडे तिच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर वानवडी पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक लगड यांच्या मार्गदर्श ना नुसार या प्रकरणाचा छडा लावून तिच्या मित्रासह १४ जणांना अटक केली आहे .

पोलिसांना तपासा दरम्यान मुंबईतही मुलीवर बलात्कार झाल्याची बाब समोर आली.

Advertisement

पोलिसांनी आरोपीची माहिती मिळवून त्याला मुंबईतून अटक केली आहे .

वाचा :  एएसके फंक्शन हॉलची १ कोटी २ लाख रूपयांची आजही थकबाकी.

Advertisement
Spread the love
कमी गुंतवणुकीत आजच आपले News Portal बनवा व पैसे कमवा

न्यूज वेबसाईट एका दिवसात बनवून मिळेल.