पत्नीला वेश्याव्यवसायाला लावणाऱ्या पतीसह दोघांना अटक
पुणे : पैशाच्या लोभापाई पतीने आपल्या पत्नीला वाममार्गाला लावत जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले होते. इतकेच नाही तर अवघ्या तीन हजार रुपयात पतीने आपल्या पत्नीला चक्क मित्रांच्या हवाली केले होते.
हेपण वाचा :महिला पोलिस अधिकारी आणि तिच्या 2 वर्षीय मुलीची हत्या
याप्रकरणी पतीच्या दोन मित्रांना अटक केली असून, पोलिसांनी आरोपीच्या पोलीस कोठडीची न्यायालयाकडे मागणी केली आहे. याप्रकरणी एका २५ वर्षांच्या विवाहित महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी पतीला अटक केली होती. सध्या तो जामीनावर आहे. पोलिसांनी अटक केलेल्या मित्रांची नावे
सुजित पुजारी (रा. आंबेगाव),आदित्य गौतम (रा.कसबा पेठ), अशी आहेत.
हेपण वाचा : गणेश मंडळांसाठी मोठी आनंदाची बातमी!

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822